विजयादशमी निमित्त दांडिया व आपट्याच्या पानावर स्वाक्षरी मोहीम

21

✒️अनिल साळवेगंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.3 ऑक्टोबर):-रोजी नवरात्र व विजयादशमी निमित्त शहरातील व्यंकटेश विद्यालय येथे वर्ग 3 री ते 7वी च्याविद्यार्थ्यांचे गरबा-दांडियाचं आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थी, पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

त्याचबरोबर आपट्याच्या पानावर विद्यार्थी ,पालकांच्या स्वाक्षरीचा नवोपक्रम राबवण्यात आला .त्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.