पी. एफ. व एक महिन्याचा BVG कंपनीचा पगार मिळण्यासाठी साठी नगरपालिकेवर गाढव मोर्चा व ठिय्या आंदोलन:अ‍ॅड. राजू भोसले

28

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.12ऑक्टोबर):- म्हसवड नगरपालिका सफाई कामगारांचा तीन वर्षाचा पी. एफ. व एक महिन्याचा BVG कंपनीचा पगार नगरपालिका मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन देऊनही गरीब कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्यामुळे ते तात्काळ द्यावेत. यामागणी साठी सोमवार दि. 17 ऑक्टोबर रोजी सिद्धनाथ मंदिरा पासून नगरपालिके पर्यंत गाढव मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटक – सचिव अ‍ॅड. राजू भोसले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

म्हसवड पोलीस स्टेशन मध्ये 50 सफाई कामगारांच्या सह्यांचे निवेदन अ‍ॅड. राजू भोसले यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना देण्यात आले.यावेळी अनिल सरतापे, योगेश आवळे, अमर लोखंडे, रघुनाथ लोखंडे, सागर लोखंडे, मारुती लोखंडे,रोहित लोखंडे हे प्रमुख कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

म्हसवड नगरपालिका सफाई कामगारांचा तीन वर्षाचा पी. एफ. व एक महिन्याचा BVG कंपनीचा पगार नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या हलगर्जी पणामुळे दिला जात नाही. तो तात्काळ द्यावा यामागणी साठी दि. 29 ऑगस्ट रोजी सिद्धनाथ मंदिरा पासून नगरपालिके पर्यंत थाळी मोर्चा काढून व आमरण उपोषण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटक – सचिव अ‍ॅड. राजू भोसले यांच्या नेतृत्वा खाली सफाई कर्मचाऱ्यांनी केले होते. यावेळी मुख्याधिकारी यांनी तीन वर्षाचा पी. एफ. व एक महिन्याचा BVG कंपनीचा पगार देण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत लेखी पत्र दिले होते.

यानंतर मुख्याधिकारी यांनी पैसे देण्याचे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना पुन्हा कर्मचायांच्या वतीने निवेदन दिले होते. त्यावेळी त्यांनी ३० सप्टेंबर पर्यंत पैसे जमा करण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. दिवाळी तोंडावर आली असताना सुद्धा गरीब हातावरील पोट असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना आद्याप पैसे दिले जात नाहीत.

यावेळी बोलताना अ‍ॅड. राजू भोसले म्हणाले कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचा तीन वर्षाचा पी एफ व BVG कंपनीचा एक महिन्याचा पगार तात्काळ म्हसवड नगरपालिका मुख्याधिकारी यांनी द्यावा. मुख्याधिकारी यांनी BVG कंपनीला वर्क ऑर्डर दिली. पण मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालया कडून वेळेत प्रशासकीय मान्यता घेतली नाही. परंतु मुख्याधिकारी आणि BVG कंपनी ने दलित मागासवर्गीय गरीब सफाई कामगारांकडून कोरोना काळ असताना सुद्धा सफाई चे काम करून घेतले. गोरगरीब दलित सफाई कामगारांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून म्हसवड शहर व परिसर साफसफाई चे काम केले आहे. असे असताना मुख्याधिकारी व BVG कंपनी गरीब कर्मचारांचा पगार देत नाहीत. या दोघांच्या वादात कर्मचाऱ्यांचा कष्टांचे पैसे कोण देणार? प्रशासकीय मान्यता वेळेत न घेता वर्क ऑर्डर देणाऱ्या मुख्याधिकाऱ्यावर दप्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत कारवाई करावी व BVG कंपनी ने प्रशासकीय मान्यता नसताना गरीब दलित कर्मचारी वर्गाकडून पगार न देता फुकट घाणीचे काम करून घेतले त्या बदल त्यांच्यावर ऍट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा का दाखल करू नये? किमान वेतन आयोग कायद्या नुसार सफाई कर्मचाऱ्यांना पगार व पी एफ दिला जातोय का याची ही शासनाने तपासणी करणे गरजेचे आहे.

गरीब कर्मचारी वर्गाचा तात्काळ एक महिन्याचा BVG कंपनी चा पगार व तीन वर्षाचा पी एफ तात्काळ जमा करावा या मागणी सोमवार दि 17 रोजी गाढव मोर्चा व ठिय्या आंदोलन सर्व उपेक्षित कर्मचारी वर्गाला बरोबर घेऊन करणार असल्याचे यावेळी अ‍ॅड. राजू भोसले यांनी सांगितले आहे.अनिल सरतापे, योगेश आवळे, अमर लोखंडे, रघुनाथ लोखंडे, मारुती लोखंडे, सागर लोखंडे , रोहित लोखंडे यांनी सर्व कर्मचारी व कार्यकर्त्यांनी सदर आंदोलना मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.