माजी सैनिक संजय जांभीलकर यांचे कार्य कौतुकास्पद

52

🔹देश सेवा करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी आम्ही नेहमी उभे राहू: विश्वास पाटील

✒️डॉ सुरेश राठोड(कोल्हापूर प्रतिनिधी)

कोल्हापूर(दि.23ऑक्टोबर):-बांधकाम कामगारांना सन्मानाची वागणूक मिळावी या उद्देशाने कोल्हापुर येथील पन्हाळा तालुक्यातील माजी सैनिक संजय जांभीलकर यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. कारगिल युद्धाच्या वेळी देशातील नागरिक सुरक्षित रहावे म्हणून स्वतःची रजा रद्द करून पुन्हा लढाईसाठी सीमेवरती उपस्थित राहणारे संजय होय, भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर ही समाजाचे ऋण फेडण्यासाठी संजय जांभीरकर नेहमी कार्यरत असतात. असे मत हिंदू रक्षा समितीचे महामंत्री डॉ सुरेश राठोड यांनी व्यक्त केले.
यश स्टीलचे मालक संजय जांभीलकर यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर देश सेवेसाठी इच्छुक असणाऱ्या गरजू मुलांना सैन्य दलात भरती होता यावे, युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, त्यांना नोकरीच्या संधी मिळावी, देशसेवा करता यावी,अनेक युवक पदवी घेतात; पण त्यांना नोकरी मिळतेच असे नाही. त्यातून बेरोजगारी वाढत आहे.

या युवकांना लष्करात करियर करण्याची संधी मिळावी, यासाठी पन्हाळा तालुक्यातील केरले येथे योद्धा कमांडो रेस्क्यू फोर्सची स्थापना केली आहे. या फोर्स द्वारे मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून, गरीब होतकरू मुलांकडून सैन्य भरतीची तयारी करून घेतली जात आहे. कसबा ठाणे फाट्यानजिक पाच वर्षांपूर्वी संजय यांनी यश स्टील पंप सुरू केले आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही भाग संजय हे समाजातील गरजू आणि वंचितांसाठी देतात. बांधकाम कामगारांचा सन्मान व्हावा याकरिता त्यांनी दीपावलीचे औचित्य राखून परिसरातील बांधकाम कामगारांचा मेळावा आयोजित केला होता.

या मेळाव्यामध्ये उपस्थित मान्यवर लाल बावटा कामगार अध्यक्ष भगवान घोरपडे, विश्वास नागरी पतसंस्थेचे चेअरमन विश्वास पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, सुभेदार आर एस पाटील, पत्रकार विक्रम पाटील व पोलीस पाटील नितीन घोरपडे यांच्या हस्ते बांकाम कामगारांना फेटा श्रीफळ, मिठाई व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले, सामाजिक भावनेतून संजय जांभीलकर करत असलेल्या कार्याचे कौतुक उपस्थित मान्यवरांनी केले.

यावेळी सरदार पाटील, ग्रामसेवक निलेश कुंभार, झावर ग्रुप संचालक एस एम पाटील, किशोर कांबळे, बाबासाहेब फाटक, विठ्ठल जरग, उद्योजक संग्राम फाटक, राहुल पाटील, नामदेव भोसले, पन्हाळा तालुक्यातील सर्व व्यापारी वर्ग व बर्थडे ग्रुप आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त सुभेदार आर एस पाटील यांनी व आभार प्रदर्शन सरकार पाटील यांनी केले