वैज्ञानिक व शेतकरी यांच्या सहकार्याने धानाच्या नवनवीन जातीची निर्मिती

40

✒️प्रतिनिधी नागभीड(संजय बागडे)मो:-९६८९८६५९५४

नागभीड(दि.23ऑक्टोबर):-तालुक्यातील तळोधी(बा.) येथील प्रगतशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध असलेलेअन्नासाहेब पोशट्टीवार यांनी आपले शिक्षण अर्धवट सोडून घरची जबाबदारी पार करीत शेतीकडे लक्ष वेधून घेतले. आज तळोधी परिसरात सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि कृषी क्षेत्रात पोशट्टीवार यांचे नाव आहे. शेतीला पूरक किराणा, कापड दुकान, हात चक्की इ. व्यवसाय वडिलोपार्जित लाभले. परंतु जास्त लक्ष शेतीकडे होते. आधुनिक पद्धतीने शेती करणे यासाठी त्यांनी शेती हिच प्रयोगशाळा समजून धानाच्या नवनवीन जाती शोधून काढली आहे. त्यात तळोधी लुचाई ही तांदूळ वान प्रसिद्ध झाली असून मुंबई बाजारात मागणी होत आहे.

आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा वारसा सून आसावरी निलेश पोशट्टीवार आणि मुलगा निलेश सांभाळत आहेत. आसावरी हिचे शिक्षण बि. ई. पर्यंत चे आहे. सासरे अण्णासाहेब पोशट्टीवार यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे शेतीकडे लक्ष कमी होत असल्याने त्यांची जबाबदारी स्वत: सून आसावरी हिने घेतली आहे. मागील २० वर्षापासून धानाच्या नवनवीन वान शोधून काढणे हेच. ध्येय मनात बाळगून ध्येयाने आसावरी सुद्धा सासरे यांचा वारसा चालवीत आहे. आसावरी पोशट्टीवार यांना वर्ड वाईड फोरम कडून वुमन इनोवेटर हा अवार्ड मिळालेला आहे. त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांच्या शेतातील तांदूळ कर्नाटक, आन्ध्रप्रदेश, मराठवाडा, तेलंगणा या राज्यात प्रसिद्ध आहे.

वैज्ञानिक डॉ. शरद पवार मुंबई यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली शेती नवीन धान वान तयार केले जाते आहे. नवीन धान वान जातीचे बासमती, रेड राईस, तळोधी हीरा, पार्वती सुत, पार्वती चिन्नोर, निलम शोधल्या आहे. तळोधी रेड, लाल गुलाब दोन वान निर्माण केले आहेत. यामध्ये ॲन्ड ऑक्सीडटमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, ह्रदयविकार, कॅन्सर या असाध्य रोग बरे होतात. यावेळी वैज्ञानिक डॉ. शरद पवार मुंबई, संजय सत्यकर कन्हान, विनोद इंगोले ॲग्रोवन, राजेंद्र दुनेदार, राजेश गायधने लाखनी, शांतलवार माडगी , गुलाबराव शेंडे सह नागभीड पत्रकार संघ व तळोधी ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. * कोट*:-माझ्या प्रमाने स्त्रियांनी पुढे येऊन शेती कसावी. स्त्री सुद्धा सक्षमपणे शेती राबू शकतो व शेतीच्या साह्याने कुटुंब आणि समाजास बळ देऊ शकतो.