काँग्रेस ओबीसी सेलची सातारा जिल्हा पदाधिकाऱ्यांची मिटींगचे नियोजन..

22

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.31ऑक्टोबर):-काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पुढील आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये “भारत जोडो यात्रा “होणार असून या भारत जोडो यात्रेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे व इतर काही महत्त्वाच्या विषयांवरती काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या जिल्हा कार्यकारणी यांच्या वतीने जिल्हा काँग्रेस भवन मध्ये दिनांक 2 नोव्हेंबर 2022 रोजी महत्त्वाची बैठक आयोजित केले आहे.

या बैठकीमध्ये राहूल गांधी यांची नांदेड येथील पदयात्रेत सहभाग साठी ईच्छुकची नाव नोंदणी करणे, आगामी होणार्‍या जि.प , पंचायत समिती , महानगरपालिका , नगरपालिका , च्या निवडणुकी संदर्भात ओबीसी विभागाची भूमिका,जात निहाय जनगणना करणे आणि सातारा जिल्ह्यातील काँग्रेस मधील ओबीसी विभागात पदाधिकारी म्हणून काम करण्यास इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांना नियुक्त करण्यासाठी चर्चा होनार आहे.

या मिटींगला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष मा.भानुदास माळी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ कुंभार , संजय तडाखे , बीसी विभाग जाकीर पठाण , मायनॉरिटी विभाग मा . सुरेश जाधव जिल्हा अध्यक्ष काँग्रेस हे उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. तरी तालुका अध्यक्ष , जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, युवा पदाधिकारी ,सर्व सदस्य यांनी उपस्थित राहावे . असे आवाहन जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष मा. शिवाजीराव गावडे शेरेकर यांनी केले आहे.