भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात उत्स्फूर्त स्वागत

47

महाराष्ट्र राज्यात काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचे जनसामान्यातून हृदय द्रावक स्वागत होत आहे. हा एक अनोखा उपक्रम काँग्रेस पक्षाचा आहे. त्याला जनता भरभरून साथ देत आहे.

हम आपके सुनने आये है!
आओ बात करे!
हम संविधान बचाने आये!
चलो साथ चले! हम करेंगे भलेभले!!

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ब्रिटिशविरुद्ध मिठाचा सत्याग्रहासाठी दांडी यात्रा काढली होती. त्यावेळेस सर्वसामान्य जनतेने महात्मा गांधी यांना उत्कृष्ट प्रतिसाद दिला व महात्मा गांधी देशातच नव्हे तर विदेशात सुद्धा अमर झाले व भारत देशाचे प्रिय बापू बनले.त्याप्रमाणे काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची पदयात्रा *असे तू हिमाचल असाच विचार आहे. की, कन्याकुमारी ते काश्मीर असा उत्तर दक्षिण प्रवास करण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला खरोखर करावे तेवढे कौतुक कमीच आहे. कारण सर्वसामान्य व्यक्तीला पाच किलोमीटर चालायचे म्हटले तर जीव खालीवर होतो. कासावीस होते. हा तर व्यक्ती अतिशय महान राजघराण्यातील थोर कुटुंबातील व्यक्ती दररोज 25 ते 30 किलोमीटर चालतो आहे. तेवढीच जनसामान्य लोकांकडून त्यांना प्रेरणाही मिळत आहे. राहुल गांधीचे पणआजोबा पंडित जवाहरलाल नेहरू बाबांची आई राष्ट्रीय नेत्या इंदिरा गांधी व पिताश्री राजीव गांधी असा त्रिस्तरीय योग पंतप्रधान होण्याचा सन्मान या गांधी नेहरू घराण्याला मिळाला ही एक अभिमानाची गोष्ट आहे.

हा भारतीय संविधानाने त्यांना दिलेला बहुमानच म्हणावा लागेल भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कर्तव्य दक्षता म्हणावी लागेल. कारण संविधानामुळे सर्व सामान्य लोकांना सुद्धा या उच्च पदावर जाता येते.

आज 07/ 11/ 2022 रोज सोमवारला राहुल गांधी यांचे जंगी देगलूर येथे स्वागत झाले. नांदेड जिल्ह्यात देगलूर येथे सर्व जनता कार्यकर्ते यांनी हातात पेटती मशाल घेऊन राहुल गांधी यांचे स्वागत केले व या मशालीच्या ज्वलंत ज्वाला नक्कीच हा फोपावलेला भ्रष्टाचार अंधकार वाढत चाललेली बेरोजगारी शेतकरी आत्महत्या सामान्य माणसावर होणारा अन्याय दूर होईल. असे सर्वसामान्य माणसाचे मत आहे.
विद्यमान पंतप्रधान यांचे निवडणुकीपूर्वी मुख्यवाक्य होते. अच्छे दिन आयेंगे काळा धन उपर आयेगा पण सारी जनता त्रस्त होत आहे. या साऱ्या पंतप्रधानाच्या बोल घेवड्या गोष्टी ऐकून जनता त्रस्त आहे. प्रत्येकाला ही महागाई खूपत आहे. त्या महागाईला गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वच लोक कंटाळले सत्तेमध्ये असलेले नसलेले कांदा कापल्यावर गृहिणीच्या डोळ्यात पाणी येते त्याप्रमाणे जनतेच्या मनात हा कांदा नसून या भाजपा सरकारला निवडून देऊन वांदा तयार झाला.असे म्हणायला हरकत नाही प्रत्येक जण सार्वत्रिक निवडणूक केव्हा येणार याकडे लक्ष देत आहे. या नरेंद्र मोदी सरकारला पूर्ण जनता कंटाळली त्यामुळे राहुल गांधीची पदयात्रा काढली तिचे पूर्णपणे पूर्ण स्तरातून स्वागत होत आहे. आणि स्वागत केलेच पाहिजे ही काळाची गरज आहे. हे आता प्रत्येकाला कळले आहे.

राहुल गांधी म्हणजे तरुण तडफदार नव्या उमेदीचा दिलदार मनाचा राजा आहे. राजाचे स्वागत करायचे नाही तर कोणाचे करायचे एक सुविचार आहे लाख मावळे मरण पावले तर चालतील पण जगाचा पोशिंदा अमर राहिला पाहिजे त्याप्रमाणे राहुल गांधी हे तुमचे आमचे सर्व जनतेचा मायबाप तथा पोशिंदा आहे. एखाद्या राजघराण्यातील तरुण तडफदार व्यक्तिमत्व म्हणजे राहुल गांधी त्यांची विशाल मनोवृत्ती दीर्घ प्रवास कोणतीही सुरक्षा नाही सर्वसामान्य माणसाची सहज भेट लहान व्यक्तीची सहज भेट कोणाची गळाभेट जवळून परिचय अपंग व्यक्ती सोबत मुलाखत अपंग व्यक्तीच्या कार्याचे कौतुक एरवी आपण दूरदर्शन मध्ये पाहत होतो. पण आज प्रत्यक्ष राहुल गांधी सोबत हस्तांदोलन होत आहे.त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटत आहे. या पदयात्रेमुळे नक्कीच काँग्रेस पक्षाला उभारी येणार हे कोणीही लपवू शकणार नाही.

हर नया सवेरा
नई उम्मीद है!
लोक सात आ रहे है!
कदम के साथ आवाज उठा रहा है!
भारत जोडते जा रहा है!
भारत जोडते जा रहा है!!

कन्याकुमारी वरून यात्रा निघाली याच भागात स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली. त्याचे दुःख न बाळगता त्याच ठिकाणावरून पिताश्रीची प्रेरणा घेऊन पदयात्रेला सुरुवात केली. किती मोठ्या मनाचे राहुल गांधी त्यांचा पूर्ण भारत जोडो पदयात्रेचा प्रवास 3570 किलोमीटर आहे. त्यापैकी महाराष्ट्रात 16 दिवस प्रवास होणार ते 384 किलोमीटर प्रवास करणार नांदेड जिल्ह्यात देगलूर नायगाव कृष्ण एमआयडीसी पिंपळगाव अर्धापूर पार्टी आणि पुढे हिंगोली जिल्ह्यात जाणार बुलढाणा अकोला अमरावती व पुढे मध्यप्रदेश रवाना होणार त्यांनी महाराष्ट्रात सातव्या दिवशी पदार्पण केले.त्यांचा एकूण 150 दिवस म्हणजे पाच महिने ते चालतच राहणार दररोज 25 ते 30 किलोमीटरचा त्यांचा प्रवास आहे. पाच ते दहा हजार लोकांचा समूह सोबत आहे त्यांना प्रवास करण्यात आनंद मिळत आहे. कुठेही थकवा जाणवत नाही त्यांचे दोन महिन्यात पाच राज्याचा प्रवास करून झाला आहे. उर्वरित सात राज्य बाकी आहेत एकूण बारा राज्याचा प्रवास आहे. खरोखर सर्व कार्य कौतुकास्पद किंवा अभिमानास्पद आहे.

या प्रवासादरम्यान आदरणीय राहुल गांधी हे सर्व सामान्यांची भेट घेत आहेत. त्यामुळे गोरगरीब शेतकरी दिनदलीत सुशिक्षित बेरोजगार मंडळी अतिशय खुश आहे. भविष्यात नक्कीच या भारत जोडो यात्रेचा बहुजनांचे सरकार काँग्रेस पक्षाला फायदा होणार जे नेते ईडीला भिऊन लालची नेते यांनी भीतीपोटी भाजपामध्ये प्रवेश केला.त्यांना नक्कीच काही कालावधीत पश्चाताप होणार म्हणजे एकनिष्ठ नेते आणि सर्वसामान्य जनता काँग्रेस तथा राहुल गांधी यांच्या सोबत आहे. त्यांना नक्कीच फायदा होणार.

राहुल गांधीचे महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात देगलूर येथे सात तारखेला सायंकाळी साडेसात वाजता पेटती मशाल घेऊन स्वागत केले. जनता भरघोस प्रतिसाद देत आहे. यावेळेस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण माणिकराव ठाकरे जयराम पाठक काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले बाळासाहेब थोरात व इतरही ज्येष्ठ तरुण युवा पिढी सोबत आहे. राहुल गांधी यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. त्यांचा नांदेड जिल्ह्यात चार दिवस पदयात्रेचा प्रवास वेगवेगळ्या ठिकाणी सभा असा बहुतस्तरीय कार्यक्रम आहे. व पुढे महाराष्ट्रातून मध्यप्रदेश मध्ये जात आहेत त्यांच्या पुढील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा…!
*तुम जियो हजारो साल, साल के दिन हो पचास हजार*

✒️शब्दांकन:-दिगंबर चंपतराव माने(शिक्षक)सत्यशोधक भाऊसाहेब माने समाज भूषण उमरखेड प्राप्त.9404412886