सुनिल भैय्या गुट्टेंचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न : कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

25

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.9नोव्हेंबर)::- लोक राजकारणाकडे वळतात. परंतु लोकांचे प्रश्न, अडचणी, भावना समजून घेण्यासाठी राजकारणी माणसाकडे मोठ मन असावं लागतं. तसेच त्या राजकारणी माणसाकडे कार्यकर्ते नावाचं मोहोळ असावं लागतं. राजकारणी माणसाला जोपर्यत चांगले कार्यकर्ते मिळत नाहीत. तोपर्यत त्याचा उत्कर्ष होत नसतो. त्यामुळे कार्यकर्ते जपले पाहिजेत. त्यांच्याशी आपुलकीने वागले पाहिजे. त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होता आलं पाहिजे. तरच तुम्हाला चांगले कार्यकर्ते मिळतात. त्यामुळे मी कार्यकर्ते जपतो. त्यांना जीव लावतो. म्हणून तेही मला जीव लावतात. त्यामुळे प्रामाणिक आणि एकनिष्ठ कार्यकर्ते हेचं माझं बळ आहे, असे स्पष्ट मत गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केले.

युवा उद्योजक सुनिल भैय्या गुट्टे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील पूजा मंगल कार्यालय येथे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाच्या वतीने आयोजित भव्य अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापुरकर, रासप प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव रोकडे, युवानेते राजेभाऊ फड, गंगाखेड शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र डोंगरे, माजी जि.प.सदस्य किशनराव भोसले, माजी सभापती शिवाजीराव निरदुडे, सुभाष नळदकर, व्यकंटराव रेवणवार, अनिल यानल्लेवार, रासपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप आळनुरे, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे, माजी सभापती मगर पोले, मुंजाराम मुंढे, माजी प.स.सदस्य लक्ष्मण मुंढे, नितीन बढे, विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके, पालम प्रभारी माधवराव गायकवाड, गंगाखेड प्रभारी हनुमंत मुंढे, जिल्हा सरचिटणीस रवि कांबळे, तालुकाध्यक्ष रामजी सातपुते, गणेश कदम, बालासाहेब रोकडे, तुकाराम पाटील, माजी नगरसेवक सत्यपाल साळवे, राधाकिशन शिंदे, वैजनाथ टोले, शहराध्यक्ष धनंजय भेंडेकर, उध्दव शिंदे, अ‍ॅड.मिलिंद क्षिरसागर, राजेभाऊ सातपुते, इकबाल चाऊस, इंतेसार सद्दिकी, सतिश घोबाळे, पिराजी कांबळे, सचिन महाजन, प्रताप मुंढे, सुमित कामत, प्रभाकर सातपुते, खालेद शेख, शेख गौस, सैफ चाऊस, सचिन नाव्हेकर, पप्पू घरजाळे, संजय पारवे, दादा कापसे, नवनाथ भुसारे, मारोती मोहिते, शिवाजी आवरगंड, नारायण मोरे, शेख ईस्माईल, प्रल्हाद कोळेकर, उध्दव शिंदे, व्यंकटेश पवार, उत्तम आवरगंड, रंगनाथ शिंदे, पशुपती शिराळे, सुदाम वाघमारे उपस्थित होते.

पुढे आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, साम, दाम, दंड व भेद म्हणजे राजकारण असा लोकमानस आहे. परंतु लोकांचे प्रश्न सोडवून त्यांच्याशी नाते जोडता येते. वर्षानुवर्ष रेंगाळलेले प्रकल्प मार्गी लागले की, लोक तुम्हाला डोक्यावर घेतात, याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेत आहे. तिन्ही तालुक्यांचा सर्वांगिण विकास करणे हेचं माझे उद्दिष्ट असून त्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करीत आहे. त्यामुळेच मला अनेक कामे मार्गी लावता आली. अजूनही काही प्रकल्प माझ्या मनात आहेत. तेही पूर्ण करण्यासाठी मी परिश्रम घेत आहे. रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य या मुलभुत प्रश्नांच्या पलीकडे जाउन विकासाची संकल्पना राबविली पाहिजे. मात्र, त्यासाठी इच्छाशक्ती असायला हवी, असे मला वाटते.
लोक आग्रहास्तव आयोजित केलेल्या या अभिष्टचिंतन सोहळ्यास आ.डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळ व राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्ह्यातील सर्व पदधिकारी आणि कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनाचे सदस्य, व्यापारी, पत्रकार संघ, गंगाखेड शुगरचे कर्मचारी, वकील संघ, नाभिक मंडळ, सरपंच मंडळी, जेष्ठ नागरिक, महिला, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी विठ्ठल सातपुते यांनी केले. तर आभार प्रभारी हनुमंत मुंढे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बाबा पोले, जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपटे, गोपी नेजे, संजय मुंढे, सुनिल तांदळे, राहूल गाडे, बाळू टोम्पे, धनराज बीडगर, हनुमंत गुट्टे, वैभव मुंढे, जनार्धन यादव, अभिजीत चक्के, सचिन राठोड, ऋषिकेश बनवसकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

…तर त्यांच्यावर बोलायला नको – आ.डॉ.गुट्टे
आध्यात्मिक वसा आणि वारसा सांगणा-या गंगाखेड शहराच्या दयनीय अवस्था झाली आहे. शहरात पाणी आणि रस्त्याचे प्रश्न गंभीर आहेत. सत्ता व निधी असताना ज्यांनी शहराचे प्रश्न सोडविले नाहीत. ते लोक आता माझ्याकडे बोट दाखवित आहेत. मात्र, मी शहराच्या विकासाचा अजेंडा घेऊन निघालो आहे. त्यामुळे त्यांच्यावर बोलायला नको. कारण, मी कामातून उत्तर देणारा माणूस आहे, असा शाब्दिक टोलाही आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी विरोधकांना उद्देशून हाणला.
माणसाच्या बोलण्यात मीपणा असू नये – *ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापुरकर*
कोणी आपल्याकडे आलं तर त्याचं आदरतिथ्य करण्याची आपली परंपरा आहे. विशेष म्हणजे बोलणं फार सोप पण, तसं वागणं कठीण आहे. त्यामुळे भक्ती आणि श्रध्दा हे माणसांच्या गुणांवर अवलंबून असतात. आपण जे पेरतो तेचं तर उगवत असते. म्हणजे बीज जसे असेल फळही तसेच मिळते. बीज म्हणजे संस्कार असतो. म्हणून संताच्या वाणीत नेहमी संस्कार दिसतात. मात्र, संस्कार विसरले की मीपणा वाढतो. पण आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर माणसाच्या बोलण्यात मीपणा नसावा, असे मत आशीर्वादपर मनोगतात ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापुरकर यांनी व्यक्त केले.

*वडील म्हणून साहेबांचा अभिमान आहे – सुनिल भैय्या गुट्टे*
गरीबी कुण्याच्याही वाट्याला येते. आम्ही सुध्दा फार गरीबीत दिवस काढले आहेत. मात्र, कष्ट आणि जिद्द ठेवल्यास कोणत्याही क्षेत्रात माणसाला यशस्वी होता येतं, हे आमच्या वडीलांनी दाखवून दिलं आहे. कमी शिक्षण आहे म्हणून ते थांबले नाहीत तर त्यांनी रात्रीचा दिवस करून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. म्हणूनचं त्यांनी कामगार ते आमदार हा प्रवास पूर्ण केला आहे. तरी सुध्दा ते थांबले नाहीत. उलट दररोज नव्या ताकदीने पुढे जात आहेत. त्यामुळे वडील म्हणून मला साहेबांचा अभिमान आहे, असे भावनिक उद्गार सत्काराला उत्तर देताना युवा उद्योजक सुनिल भैय्या गुट्टे यांनी काढले.