कर्मवीर विद्यालय नागभीड चा विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

22

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभिड(दि. 12 नोव्हेंबर):- महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे तर्फे घेण्यात येणाऱ्या पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी मध्ये 298 पैकी 196 (65.77%) गुण घेऊन कर्मवीर विद्यालय नागभीड येथील विद्यार्थी पराग उत्तम मेश्राम हा शिष्यवृत्ती साठी पात्र ठरलेला आहे.दरवर्षी प्रमाने पराग मेश्राम ने घवघवीत यश संपादित करीत याहीवर्षी उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली.

पराग ने मिळवलेल्या यशामध्ये आई-वडील तसेच प्राचार्य,पर्यवेक्षक व मार्गदर्शक प्रा,किशोर नरुले ,प्रा,.गुरुदेव पिसे,प्रा,प्रभुजी वाघधरे,प्रा,मनिषा दडमल,प्रा,शरयु दडमल यांनी त्याला मार्गदर्शन केले.

गोंडवन विकास शिक्षण संस्था नागभीड चे सचिव श्री.रविंद्रजी जनवार ,संस्था अध्यक्ष श्री.राजाभाऊ देशपांडे यांनी परागचे अभिनंदन केले तसेच विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य देविदासजी चिलबुले पर्यवेक्षक युवराज ईडपाचे तथा सर्व शिक्षक वृंदानी पुष्पगुच्छ देऊन परागचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.