पेपर वितरण करनाऱ्या मुलांचा सत्कार-वामणराव पाटील स्मृती प्रतिष्ठाणची संकल्पना

32

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)

चिमूर(दि.12नोव्हेंबर):-उन्हाळा पाऊसाळा हिवाळा या ऋतूत कशाची ही तमा न बाळगता वर्षभर सायकल ने पेपर -पेपर म्हणून घरोघरी पेपरचे वितरण अल्पशा मानधनावर काम करनारा,ज्याला पेपर वाट्या असे समाजात संबोधले जाते. अशांचा सत्कार शहरातील मानीक नगर येथील डांगे निवास येथे पार पडला.

नागरीकांना सकाळच्या चाय बरोबर पेपर वाचनाची सवय आहे. त्या वेळेत पेपर पोहचला नाही तर नागरीकांचा जिव कसा बसा होतो. वाचकांच्या वेळेपर्यत दररोज सकाळी पेपर पोहचविन्याचे काम पेपर वितरण करनारी मुलं करतात, पेपरला थोडा उशीर झाला तर वाचकांच्या शिव्या ऐकाव लागते मात्र पेपर वितरण करनाऱ्या मुलांची दखल कोणिच घेत नाही. अनेक घटकातील लोकांचा सत्कार कोणत्या ना कोणत्या प्रसंगी होतांना आपल्याला दिसतो मात्र पेपर वितरण करणाऱ्या मुलांचा सत्कार होताना दिसत नाही.

यांची दखल घेत अशांचा ही सत्कार झाला पाहीजे अशी संकल्पना स्व वामणराव पाटील स्मृती प्रतिष्ठाणचे सचिव सुरेश डांगे यांच्या मनात आली. याच अनोख्या संकल्पनेतून स्व वामणराव पाटील यांच्या स्मृतीचे औचीत्य साधून चिमूरच्या इतिहासात पहिल्यांदाच पेपर वितरण करनार्या मुलांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देवून सत्कार करन्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चिमूर पत्रकार चुन्नीलाल कुडवे, प्रमुख अतिथी राष्ट्रसंत मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास कामडी, राष्ट्र सेवा दलाचे इमरान कुरेशी, राजकुमार चुनारकर, मनोज राऊत, हरी मेश्राम आदी उपस्थीत होते.

कार्यक्रमा दरम्यान पेपर हॉकर्स राजू श्रीरामे पेपर वितरक, वैभव मोडक, आशिष जांभूळे, सुरज कापसे, कुनाल रोकडे, ओम रोडगे, कुनाल झाडे, रमण खेडकर, रोजान शेख, अरमान हबीब शेख आदीचा प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन कैलास बोरकर, प्रास्तावीक सुरेश डांगे, आभार रावण शेरकुरे यांनी केले.