जनजातीय गौरव दिनाच्या निमित्ताने वकृत्व स्पर्धा व व्याख्यान संपन्न

26

🔸थोर क्रांतीकारक बिरसा मुंडा यांचे कार्य ऐतिहासिक – बंडोपंत बोढेकर

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.17नोव्हेंबर):- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने बिरसा मुंडा जयंती अर्थात जनजातीय गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

नवीन वर्कशॉपमध्ये आयोजित या कार्यक्रमात प्रथमतः विद्यार्थ्यांसाठी जनजातीय क्रांतिकारकांचे स्वातंत्र्य आंदोलनात योगदान या विषयावर क्वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात चेतन मोहुर्ले, पियुष जुमनाके,लखन आत्राम,रसिका हुंड्रा,अनुप पिपरे यांनी भाग घेतला.झालेल्या स्पर्धेचे परीक्षण करून विजेते निवडण्यात आले. यानंतर बिरसा मुंडाच्या जीवन कार्यावर ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले गेले. अध्यक्षस्थानी गटनिदेशक आनंद मधुपवार होते.तर गटनिदेशक केशव डाबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरूवातीला मेश्राम यांनी विचार मांडले.

प्रास्ताविकपर विचार केशव डाबरे यांनी मांडले. तर निदेशक श्री. हेमंत गेडाम यांनी बिरसा मुंडाच्या जीवनावर प्रकाश टाकला.याप्रसंगी श्री. बोढेकर व्याख्यानाचे पुष्प गुंफताना म्हणाले की, आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांनी लोकांना संघटित करून तत्कालीन व्यवस्थेविरुद्ध, शोषणाविरुद्ध मोठे बंड पुकारले होते. त्यांनी आपल्या अल्प आयुष्यात केलेले कार्य अखिल जनजातीसाठी प्रेरक ठरले आहे. त्यांच्या जीवनकार्यापासून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपले जीवन आदर्शवत केले पाहिजे, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंद मधुपवार यांनीही समयोचित विचार व्यक्त करून बिरसा मुंडा यांचा विचार आत्मसात करावा, असे आवाहन केले. सूत्रसंचालन सतिशचंद्र भरडकर यांनी केले तर तुषार कोडापे यांनी आभार मानले. कार्यक्रमास सर्व व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.