आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची का वाटते भिती

  45

  ज्यांची आजही प्रामाणिक नाही निती
  त्याचा आजही बाबासाहेब यांची वाटे भिती

  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकासाठी बांधलेल्या राजगृह ही वास्तु नाही तर जगातले सर्वात मोठे वैयक्तिक वाचणालय आहे. सामाजिक क्रांती चा फायदा ज्या लोकांना झाला आणि पशुपेक्षाही हिन समजल्या गेलेले लोक आज माणसात आले त्यांच्या क्रांतीचे व अस्मितेचे ठिकाण म्हणजे राजगृह होय. या राजगृहा मध्ये फक्त बाबासाहेब आंबेडकरच नाही तर समतावादी भारताच्या उभारणीसाठी लागणाऱ्या त्याग आणि समर्पनाची एक एक ओळख राजगृहामध्ये आहे. दोन दिवसा अगोदर राजगृह येथे हल्ला काही हल्लेखोरांने राजगृहाची नासधूस केली. आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राजगृहावर हल्ला झाला याचा निषेध प्रत्येक स्तरावरून झाला. पण यामध्ये ही एक बाब समोर आली सुशिक्षित व पुढारलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवले. प्रगतीची सर्व रस्ते मोकळे केले तेथेच आजही बाबासाहेब आंबेडकर जातीमध्ये बंद दिसत आहेत. कारण राजगृह प्रकरणाचा जास्त त्रास व जास्त भावना फक्त बौद्धांच्याच दुखल्या असे वाटत आहे. याचा अर्थ असा नाही कि बौद्धेत्तर लोकांना आजही बाबासाहेब कळाले नाही असा मुळीच नाही. त्यांना बाबासाहेब कळाले, सत्य परिस्थिती कळाली पण जर मी याचा निषेध केला तर जातीतील लोक काय म्हणतील असा हलकासा प्रश्न डोक्यात येतो म्हणून काही लोक याचा निषेध सुध्दा करत नाहीत. हिच तर माणसिक गुलामी आहे. आता राहीला प्रश्न हा हल्ला केला कोणी तर कँमेरँत पकडलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली त्याला अटक केल्याबरोबर डॉक्टरांनी त्याला मनोरूग्ण म्हणून घोषित केले. त्याला मनोरूग्ण म्हणून घोषित करणे हे एक षडयंत्र आहे हे बाबासाहेब आंबेडकर यांना थोडेफार जर कोणी वाचले तरी कळते. हजारो वर्षाची माणसिक गुलामी तोडून ज्यांना माणसात आणले त्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाचनालयावर आणि करोडो लोकांच्या अस्मितेवर दगडफेकणारा मनोरूग्ण कसा होऊ शकतो? मनोरूग्ण असेल तर फक्त तो राजगृहावरच दगडफेक करतो बाहेर रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर दगडफेक करत नाही. मनोरूग्ण व्यक्ती बरोबर गेटमधुनच आत जातो. मनोरूग्ण व्यक्ती बरोबर कँमेरे फोडतो, मनोरूग्ण व्यक्ती बरोबर तेथुन निघून जातो, किती मस्त आहे ना एक मनोरूग्ण व्यक्ती किती चांगल्या प्रकारे नियोजन करू शकतो. लॉकडाऊन च्या काळामध्ये मनोरुग्ण तरुण घराच्या बाहेर येतो, मनोरूग्ण तरुणावर घरचे लोक लक्ष ठेवत नाहीत, मनोरूग्ण तरूण मस्त नीटनेटका राहतो, असे बरेच प्रश्न मला या मनोरुग्ण तरुणांबद्दल पडले. निषेध व्यक्त करताना अनेकांनी आपला रोष, राग व्यक्त केला पण हे षडयंत्र ज्यांनी रचले त्या मास्टरमाइंड च काय? अरे दगड एका तरूणाने राजगृहावर मारला नाही. हा दगड मारला विषमतेची घाण समाजात जन्माला घालणाऱ्या व्यवस्थेने मानवी स्वातंत्र्यावर मारलेला दगड पुन्हा गुलामीकडे घेऊन जाण्याची जाणीव करून देतोय. दगड मारणारा मनोरूग्ण नाही मनोरुग्न आहे ही प्रस्थापित व्यवस्था. ज्या व्यवस्थेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देखील चालत नाही. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यापासून तर संविधान नाकारणाऱ्या लोकांच्या संख्या काही कमी नाही. वेगवेगळ्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य व वास्तु नष्ट करण्याचे काम येथील व्यवस्था करत आहे. पुतळ्यांची विटंबना असो वा बुद्धभुषण प्रिंटिंग ची इमारत पाडणे असो, संविधानांची पायमल्ली असो येथे प्रत्येक वेळेस केली जाते. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिक्षण, आरक्षण, आणि इतर दिलेले मानवी स्वातंत्र्याचे साधने पचणारे नाहीत म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतरही विषमतावादी व्यवस्था बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने भयभीत झालेली आहे.
  नितीहीन आणि बेईमानी मनात ठासून भरलेली ही व्यवस्था बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आजही का घाबरत आहे. काय नेमके कारण आहे याचा विचार केला तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण असो आरक्षण असो सामाजिक समता, सामाजिक न्याय हा कायदेशीर देऊन मानसाला माणसात आणण्याचे काम यशस्वी पणे केलेले आहेत. मुक्याना बोलायला शिकवले आणि आज हे एवढे बोलत आहेत की सरळ व्यवस्थेला प्रश्न करत आहेत. घाण विचाराने, अंधविश्वासाने, पाखंडाने विषमतावाद, जातीवादाची जननी असलेल्या व्यवस्थेला डॉ बाबासाहेब आंबेडकर हे खुप घातक वाटत आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिक्षणामुळे चिकित्सा आणि समिक्षक निर्माण झाले. प्रत्येक गोष्टीची चिकित्सा आणि समिक्षा होऊन सत्य शोधायला सुरवात झाली. सत्य शोधताना पाखंड आणि अंधविश्वास यावर पोटभरणाऱ्या लोकांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत आहे. हा थोका थांबवणे शक्य नाही. आणि व्यवस्थेला हादरा बसावा अशी फळी निर्माण झाल्याने या विषतावाद जोपासणाऱ्या पिळावळींना बाबासाहेब आंबेडकर यांचा राग येतो. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जी ऊर्जा समाजामध्ये भरलेली आहे या उर्जेच्या प्रभावामुळे पाखंड आणि थोतांड जोपासणाऱ्या लोकांची झोप उडाली आहे. आरक्षणा मुळे प्रतिनिधित्व मिळाले आणि याचाच फायदा अनेक लोक प्रशासकीय सेवा व इतर शासकीय क्षेत्रात जाऊन बसले. त्यांना गावात येण्याची मुभा नव्हती असे लोक शासनाच्या चार चाकी गाडीने फिरतात हिच गोष्ट त्यांना पचत नाही म्हणून असे षंढ कारी प्रकार करण्याचा ते प्रयत्न करत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व ज्ञान इतके व्यापक व सखोल होते की कोणत्याही क्षेत्राचा अभ्यास करायचा तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भा शिवाय पुर्णच होऊ शकत नाही. प्रसार माध्यमे व्यवस्थेच्या हाती असल्याने या प्रसारमाध्यमांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजामध्ये पेरले नाही. या उलट पाखंड अज्ञान आणि अंधविश्वास मजबूत कसा होईल यावर लक्ष केंद्रित करून लोकांना मानसिक गुलाम बनवण्याचे काम केले. परंतु सोशल मिडीयाच्या माध्यमातून आज सत्य माहिती लोकांपर्यंत पोहचत आहे. लोक जागृत होऊन हक्क अधिकाराच्या गोष्टी बोलत आहेत. सत्तेमधला वाटा माघत आहेत. आज मानव मानवा सोबतचे मानवी वर्तन अपेक्षित करत आहे. संविधाना नुसार अंमलबजावणी होत नाही म्हणून अंमलबजावणी चा हट्ट धरत आहेत. मुका बोलायला लागला, लंगडा पळायला लागला. आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या सुख सुविधा भोगायला लागला. हेच सुख वैभव या लोकांना पचत नाही. आणि दिवसेंदिवस संविधानाच्या माध्यमातून लोकांना जागृत करून संविधान अपेक्षित लढा उभा करण्यामध्ये आंबेडकरवादी समुहाचा खूप मोठा वाटा आहे. मग ते ओबिसीचे आरक्षण असो, मराठा आरक्षण असो अशा मागण्यासाठी आंबेडकरवादी लोकांनी एकी दाखवून संविधानाने जे दिले ते मिळायलाच पाहिजे या साठी महाराष्ट्र भर प्रबोधनाचे काम केले. ज्या लोकांनी संविधान बघितले नव्हेत ते लोक आज संविधान वाचून हक्क अधिकार मिळण्यासाठी लढा उभारत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यार्थी, शेतकरी यांच्या विषयी विचार आज पसरायला सुरवात झालेली आहे. हे सर्व मानसाच्या कल्याणाचा कार्यक्रम असला तरी व्यवस्थेचे ठेकेदार मानव कल्याणाचे काम करण्यासाठी तयार नाहीत. त्यांना आजही विषमतावादी, अंधविश्वासाने भरलेली पाखंड आणि अज्ञानाच्या जोरावर पुर्वीची सामाजिक व्यवस्थाच आजही निर्माण करायची आहे पण याला अडचण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ठरत आहे म्हणून आजही ही व्यवस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या विचारांना आजही भित आहे.
  डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एक असे रसायन आहे या रसायनामुळे जातीवाद, धर्मवाद पाखंड मातीत गडून समतावादी व्यवस्था निर्माण होते. बंधुता आणि न्याय नांदायला लागतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे समता होय. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सामाजिक न्याय डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भिक्षा मागून खाऱ्याला देशाच्या कारभारात सहभागी होण्याची ताकद होय. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे स्वाभिमान होय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे स्वंयसन्मान होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे देशाची योग्य बांधनी होय, डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे राष्ट्र प्रेम होय, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे महिलांचे संरक्षण होय. थोडक्यात बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच ज्ञानाचा महासागर आणि क्रांतीची पेटची मशाल होय. जगातील सर्वच रेकॉर्ड बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढे फिके आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अन्याय अत्याचारा विरूद्ध बंड होय. मानसाची माणूस म्हणून ओळख म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. व्यवस्थेला आर्थिक प्रगती आज मान्य आहे पण बौद्धिक प्रगती मान्य नाही. लाचारी आणि गुलामी मान्य आहे पण स्वाभिमान मान्य नाही. आज लोक स्वाभिमानी बनत आहेत, लोक वैचारिक आणि बौद्धिक बनत आहेत हिच बाब नको आहे म्हणून राजगृहा सारखे प्रकार करत आहेत. कारण त्यांना भिती मानसांची नाही तर विचाराची आहे. त्यांना भिती प्रत्युत्तराची नाही तर परिवर्तनाची आहे. ज्यांच्या डोक्यात घाण आहे, ज्यांना मानसाला गुलाम बनवून कुत्र्यांसोबत फिरायचे आहे अशा चड्डीतील लोकांना बाबासाहेब आंबेडकर यांची आजही भिती वाटत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने व्यवस्थेची चट्टी आता गिली झालेली आहे ती पिवळी होण्यास उशीर लागणार नाही याची जाणीव व्यवस्थेला आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब यांची आजही भिती त्यांच्या मनात ठासून भरलेली आहे.

  ✒️विनोद पंजाबराव सदावर्ते
  रा. आरेगांव ता. मेहकर
  मो:- ९१३०९७९३००