आत्महत्या एक समस्या आहे. पण उपाय नाही

33

“दिखाई बेशक किसी को न दे पर शामिल जरूर होता है ..हर खुद्कुशी करने वाले का कोई न कोई कातील जरूर होता है .”

शेवटी आत्महत्या एक निर्दयी खून आहे. हे वाक्य ऐकताच मनात येते की ,खर आहे .दु:ख जेव्हा पेलवता येत नाही ,एकट वाटू लागते ,विश्वासघात होते ,बिझनेस मध्ये एखाद मोठ नुकसान होते.इतक प्रेम करूनही अचानक कुणी सोडून जाते .खूप अभ्यास करून सुद्धा अपयश हाती येते आणि पालकांच्या ,स्व:ताच्या,समाजाच्या अपेक्षा मध्ये आपण अपयशी ठरतो .कॉलेज मध्ये वेगवगळ्या पोलीटीक्सला बळी पडतो ,ऑफिस मधल ताण पेलवत नसते .भविष्याची काळजी अतिप्रमानात केली जाते. तेव्हा कितीतरी अशी लोक अप्रत्यक्षरित्या कारणीभूत असतात. पण आत्महत्या करणारा व्यक्ती सर्वात जास्त स्व:तावर प्रेम करतो. फक्त ती वेळ त्यांना म्यानेज करता येत नाही.नेमक तेव्हा कुणी मन मोकळ कराव असं सापडत नाही. आत्महत्या हा उपाय नाही हे करणाऱ्याला सुद्धा माहिती असते.पण तेव्हा वादळात सापडलेल्या भावनेला ओढून जागेवर आणायची दिशा सापडत नाही.
जगात दरवर्षी ८००,००० वर लोक आत्महत्या करतात. १३५,००० (१७%) लोक भारतातील आहे. १८७,००० लोक भारतात २०१० मध्ये आत्म्ह्तेचा आकडा दिसून आलेला आहे. WHO नुसार १००,००० स्त्रिया (जगात ६ व्या क्रमांकावर आहे )तसेच पुरुष २५.८ (जगात २२ व्या स्थान वर आहे .) महाराष्ट्र मध्ये ११.९ % आहे .तर तामिळनाडू आणि केरला मध्ये याचे प्रमाण जास्त आढळून आले. ही क्रमवारी दरवर्षी वाढताना दिसते आहे.
१० ते १९ वयोगटातील आत्महत्या करण्याचे कारण वेगळे असतात . तर २० ते ३५ वयोगटातील कारणे वेगळे असतात .शेतकरी बांधवाचे दु:ख वेगळे असते.स्त्रियाचे दु:ख वेगळे असते . एकूण कारण मिळते जुळते असतात. भारतात दर तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो. किशोरवयीन व तरुण मुलांच्या मागे आत्महत्या करण्याचे कौटुंबिक समस्या ,शारीरिक व भावनिक आजार ,शाळा ,कॉलेज मधले अपयश ,प्रेम –प्रकरणे ,ड्रग्स व लैंगीक अत्याचार ,पिअर प्रेशर ,आई वडीलांनी एखादा हट्ट न पुरवने . सध्याच्या परिस्थिती मध्ये सर्वात मोठे कारण सोशल मिडीयाचा अतिरेकी वापर ,पब्जी सारखे गेम मधून नागपूर शहरात 9 मुलांनी आत्महत्या केली आहे.इतर छोटया गावात , शहरात यांची संख्या वेगळीच बघायला मिळते.हातातून मोबाईल घेतलं म्हणून मुलांचं राग अनावर होऊन जन्म दात्या वडिलांची हत्या, aआत्महत्या प्रकार उघडकीस आलेत. सध्या मोबाईल चा विळखा आत्महत्या करण्यास खुप मोठे व्यसन ठरले आहे. चांगले, वाईट दोन्ही बाजू असतात. पण आपण कोणत्या पद्धतीने या डिजिटल दुनियेत जगायचं हे आपण ठरवायचं. किवा लाईक्स मिळवन ,मोबाइलचे अतिवेड ते व्यसन त्यांना विळख्यात अडकवत असते .आजकाल लहान मुलामध्ये सुद्धा भावनिक आजार दिसू लागले .निराशा (डिप्रेशन) व चिंता (Anxiety ) यांचे प्रमाण जास्त वाढलेले दिसून येत आहे. किशोरवयीन मुलांच्या मेंदूमध्ये जिथे भावना निर्माण होतात ,मन संवेदनशील होते ,विचार करते त्याला लिंबिंक सिस्टीम म्हणतात. हे लवकर विकसित होते पण भावनांवर निंयत्रण ठेवणारे जे मेंदूमधील स्थान असते ,ते पूर्णपणे विकसित व्हायला वेळ लागतो. त्यामुळे ही मुल भावनाविवश होऊन आत्महत्या सारखे निर्णय सहज घेऊ पाहतात . भावनांचा धबधबा असल्याने भावनांचे प्राबल्य वाढते.
स्वत:च्या आवडीनिवडी जपायला शिकवणे गरजेचे आहे.फक्त डी.पी .सुंदर दिसावं आणि सोशल मिडिया मध्ये फिरण्याचे फोटो टाकून खूप लाईक मिळवन हा आपल्या जीवनाचा ध्येय असू शकत नाही हे नीट समजावून सांगणे गरजेचे आहे.नकार पचवणे ,हार पचवणे सुद्धा शिकलं पाहिजे .त्या शिवाय चांगल्या गोष्टी आनंद ,यश ,याची चव कळणार नाही.भावना हाताळता येन गरजेच आहे ,व्यक्त करता येन गरजेच आहे .सायबर सुरक्षा सुद्धा मुलांना समजायला पाहिजे .काही किशोरवयीन मुले वयाचाही विचार करता आपल्या पेक्षा मोठ्या स्त्रियांना नको ते क्लिप्स पाठवतात .एक निरोगी नागरिक आपल्या देशाला लाभाव हीच इच्छा असायला हवी.मी कसा दिसतो यापेक्षा आपल्या गुणाला महत्व देऊन स्व:तावर प्रेम करता आले पाहिजे.स्व:तच आदर करता आल पाहिजे.मुलावर समाजिक ताण आलं की ,वरवर खोट बोलून आपण किती चांगले आहोत हा दिखावा करतात .चोरी पकडल्या गेली की ,ही डिप्रेशन किव्हा आत्महत्याला बळी पडतात.सामाजिकदृष्ट्या मी योग्य वागते आहे न हा प्रंचड दबाव असते .मनात जे येते त्या भावनेवर आवर घालून चुकीच्या दिशेने पळू लागतात.मित्र –मैत्रिणी मध्ये थाट बाट दाखवणारे एकट्यात अंधारात राहणे पसंत करतात.
कारणे :- खुपदा ही कारणे अनुवांशिक सुद्धा असतात.
Extra marital affairs ,हुंडाबळी संबधीत कारणे,अयशस्वी लग्न ,प्रेम प्रकरण ,गरिबी (poverty ), बेरोजगारी,(unemployment) ,प्रिय व्यक्तीचे मृत्यू ,सोसायटी मधले इमेजची भीती ,लोक काय म्हणतील याच सतत प्रेशर असणे ,अपयश (फेलीयर),कौटुंबिक मतभेद ,दुर्लक्ष ,समजून न घेणे ,भांडण ,कलह ,ड्रग ,दारूचे व्यसनाच्या विळख्यात अडकलेले ,चुकीच्या मार्गाला लागलेले आणि कर्जबाजारी झालेले ,शारीरिक गंभीर आजार ,त्यात मानसिक आजार जसे की डिप्रेशन ,टेन्शन ,बायपोलर disorder etc ,अति जास्त चिंता करणे .काही लोकांनी कुणाच शारीरिक सोशन केले असते,रिलेनशिप मध्ये ब्रेकअप झालं असेल .इत्यादी.
स्त्रिया मध्ये इस्ट्रोजण ,प्रोजेस्टोरोनचे प्रमाण खालावलेल्या अवस्थेत नेहमी ती ताणास बळी पडते तो ताण असह्य झाल्याने अस्थिरता ,नैराश्य यात ती बुडून जाते आणि तिला प्रचंड भीती वाटू लागते.आत्महत्येचे प्लान ती करू लागते इतकी तिची मजल जाते. असं एका डॉक्टर यांच्या लेखात वाचनात आले आहे.भितीबरोबर राग ,रडू जोरदार सुरु होते.याला वैद्यकीय भाषेत पाळीपूर्व सिफोरिक डिसऑर्डर म्हणतात.
एखादी अशी चूक घडली असेल ज्याचा गिल्ट आहे पण स्व:ताला माफ करू शकत नाही .जगाच्या नजरेत ती चूक मोठी –छोटी असू शकते .पण करणाऱ्याला ती अपराध व आतून गिल्ट या भावनेणे अर्ध जीव घेते.आतल्या आत सलत असलेल कोणतेही दु:ख ,आतल्या आत घुसमटीमूळे त्रासलेले असतात .वेदनेने त्रासलेले असतात .ही अपराधीपणाची भावना इतकी पोखरून काढते की आत्महत्या हा एकमेव उपाय दिसते .
शारीरिक सोशन जसे घडतात तसे भावनिक सोशन केले जाते.फक्त भावनिक त्रास शरीरावर घावाच्या रुपात दीसत नाही.कुणाच्याही भावनांसोबत खेळणे हा आत्महत्या करण्यास खूप मोठा कारण असते.अपमान करणे ,ते सहन न झाल्यास थेट आत्महत्या करणे उपाय वाटतो.
उपाय :-सायकोलॉजीस्ट ,काऊन्सलर यांना भेट नक्की द्यावी .हेल्प लाईन ला फोन करून मदत मिळवता येईल.जवळपासच्या हेल्प लाईनचे नंबर जवळ असू द्यावे.जवळचा विश्वासू मित्र /मैत्रीण ,आपली लोक यांना आपलं दु:ख सांगून बघावं .डायरी मध्ये लिहून मन मोकळ करता येऊ शकते.हसण्याचा प्रयत्न कराव .व्यायाम खूप गरजेच आहे जेव्हा नैराश्य मनात आल असेल.तेव्हा ही उपाय ब्रेन मधल्या ताणाला कमी करण्यास व वेगळं केमिकल फ्लो होऊन मन हलकं होण्यास मदत करते.
CBT (कॉग्निटीव्ह बिव्हेवियरल थेरेपी ) ही talk थेरेपीची एक पद्धत आहे .याचा वापर सहसा त्या लोकावर केले जाते ज्यांच्या मनात आत्म्हतेचे विचार मनात येतात. .
जेव्हा एखादा व्यक्ती वारवार सूचना देतोय की त्याला जगायची इच्छा नाही.ही धोक्याची घंटा असते.मनातल्या मनात कुढत असतात ,भावना दाबून धरतात .क्षणोक्षणी ही जाणीव करून देतात की ,इतंसारख तो हुशार नाही. लायकीचा नाही असं म्हणून खूपदा आपण प्रवचन देतं असतो पण याचं असर यांच्यावर होत नाही. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या वेळी डिप्रेशन आणि बिहेवियरल बदल जाणवू लागते. suicidal thoughts एक सामान्य विचार आहे . मी आत्महत्या करेल अश्या सूचना तो स्ट्रेस ,डिप्रेशन मध्ये तो देत असतो .हा इशारा कुटुंबातील लोकांनी सिरीयसली घ्यायला हवे .३० करोड लोक डिप्रेशनचा शिकार आहे .
आत्महत्या करणे ,हा निर्णय घाबरट,पळपुटे लूझर लोक घेत्तात असं म्हणतात . पण हा निर्णय खूप अवघड व स्व:ताला मारणे म्हणजे हिंमत लागत असते . इतकं कठोर निर्णय घेणे आणि क्षणात स्व:ताला संपवणे सोपे नाही ..ज्या लोकांनी आत्महत्या केली आहे .त्यांच्या शरीरागतीविधीया आणि स्ट्रेस हार्मोन दिसायला मिळते.
सेरोटोनिना एक प्रकारे ,मेंदूमध्ये केमिकल न्युरोट्रांसमीटर ) असते. ,जे मूड ,चिंता आणि आवेगशीलता(इम्पलसिव्ह)शी जुडलेल असते.जे आत्महत्या करणारे व्यक्ती असतात सेरिब्रेस्पाइनल फ्लूड (CSF ) आणि डोक्यात सेरोटोनिनचा स्तर सामान्य पेक्षा कमी बघायला मिळते .
याआधी कधी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे किंवा याआधी कुटुंबात कुणी आत्महत्या केली असेल ,स्ट्रेस किवां
चांगली झोप होत नसेल , डिप्रेशनचे आजार कुटुंबात असेल तेव्हा सुद्धा हे घडून येताना दिसते.
आत्महत्या करण्यास केवळ आर्थिक कारण प्रत्येक वेळी नसते. WHO प्रमाणे आत्महत्या करण्यात आपला देश १९ व्या स्थानावर आहे . कोणताही व्यक्तीची इच्छा मरायची नसते . कुणीतरी त्याच म्हणन समजून घ्यावं ,आतलं आवाज आपल्या माणसापर्यंत जाव आणि त्यांनी आपल्यालाला यातून बाहेर काढावं ,खूप रडावं ,किंचाळत ओरडावं ,कुणाच्या तरी मांडीवर डोक ठेवून निवांत झोपावं ,कुणीतरी प्रेमाने थोपटाव ..एकट्या मनाला दिलासा ,आधार ,प्रेम ,काळजी मिळावी वाटते .पण आपलं आवाज कुणापर्यंत पोहचत नाही .ज्यांना दिसते ते ऐकून सुद्धा दुर्लक्ष करतात .’
खुपदा आत्महत्या करणारे मरायची इच्छा जाहीर करतात . महत्वपूर्ण काम अचानक पूर्ण करतात.बाय ,गुड बाय चे स्टेट्स ठेवतात. अचानक आपली आवडती वस्तू कुणालाही देतात किंवा दान करतात .आपल्या आवडीचा काम असून दुर्लक्ष करतात ,आवडीच खायचं असून सुद्धा खाण्यात मन नसते.
त्यांना उपदेश करू नका .तुम्ही कितीही मुलांचा वास्ता दिले तर कारण त्यांच्यावर असर होत नाही.आपल्या लोकांशी बोलत चला .विचार करण्याची ताकत विचारशक्ती शून्य होते.
जेव्हा व्यक्ती डिप्रेशनमुळे त्रस्त असते.त्यांना केवळ अंधकार दिसत असते.त्यांना अंधाऱ्या कोठडीत एकट रहायला आवडू लागते. ही लोक अनेक प्रकरच्या आतल्या द्वंद ,युद्धाशी सामना करत असतात.जे कधी शारीरिक रुपात बाहेर दिसतात.शारीरक रुपात ते आजाराच्या रूपात बाहेर पडतात. डिप्रेशन, चिडचिड, दुःख, राग दाबून धरणे यामुळे ते शरीरातील सेल ड्यामेज करतात. राग ही एक शक्ती असते. तिला जितकं आत साठवून ठेवलं ते, शरीरात रस्ता शोधून काढते. राग साठवून ठेवणारे, सतत वेदनेत असणारे स्व:ताला नुकसान पोहचवून दुख बाहेर काढतात.प्रत्येक गोष्ट आवाक्याबाहेर ,अतिप्रमाणात होऊ लागते तेव्हा ही व्यक्ती स्व:ताला किंवा दुसऱ्याला नुकसान पोहचवतात.त्यांच्या आतला प्रकाश संपलेला असते त्यामुळे आत बाहेर फक्त आणि फक्त अंधार आणि कोणतीही उमीद दिसत नसते.वैचारिक मतभेद होतात त्यामुळे प्रमाणाबाहेर टेन्शन क्यारी करतात. हा डिप्रेशन झोपू देत नाही. कमी झोप किंवा झोप न झाल्यामुळे त्रास वाढतो. पहिले झोपेचं नियोजन नीट सांभाळून दैनंदिन काम करत राहावे.
रेल्वे लाईन वर झोपणे ,नदीत उडी मारून जीव देणे.घात करणारे केमिकलयुक्त काहीतरी पिऊन जीव देण्याचं प्रयत्न करणे. अशी लोक अंश्रद्धेला लवकर बळी पडतात. वाट मिळेल तिथे विश्वासाने जातात. बरेच लोक दुःख कमी करुन देण्याचं मार्ग दाखवतो याखाली पैसे उखडतात. शेवटी प्रश्न आपलें. दुःख आपलें तेव्हा मार्ग आपणच शोधून काढायचे असतात. सायन्स, डॉक्टर हिचं लोक यातून बाहेर काढू शकतात. आपलं आपल्यावर विश्वास असू द्यावं. कोणतीही दैवी शक्ती, भोंदू लोक तुम्हाला डिप्रेशन, अडचणीतून बाहेर काढू शकत नाही. दु:ख आणि स्ट्रेस याची गती इतकी वाढली असते की आतून ब्रेन मध्ये सर्व विचार करण्याची क्षमता शून्य होते.
आत्महत्याचे विचार का येतात ? त्यांना कोणतेही ऑप्शन दिसत नाही.उपाय ,मार्ग सापडत नाही .आशेचा किरण दिसत नाही हे सर्व संपले त्यांना वाटू लागते.तेव्हा त्यांना आत्महत्या करावी वाटते.
प्रेमी युगुल यांना घरून समजून घेतल नाही की जोडीने आत्महत्या करतात .कारण त्यांना वाटत इथे कुणीच आपल्यलाला समजून घेत नाही व आम्ही दोघे एकमेकाशिवाय जगू शकत नाही ते विरहाच दु:ख पचवता येत नाही म्हणून ते आत्महत्या करतात .दोघेही इमोशनल असतात तेव्हा चालणारी गाडी खाई मध्ये तर पडेलच . प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलून समजून घेणं गरजेचं आहे.मुलांना कृपया जात -धर्म यात अडकवून चुकिची दिशा दाखवू नका. जेव्हा ही प्रेमात पडणारी युवक असतात. आंतर्जातीय प्रेमविवाह मान्य नाही म्हणून यांच माईंडसेट असते की पळून जाऊन लग्न करावं किंवा आत्महत्या करावी.
एक निरोगी मनाचं स्वास्थ टिकवणं गरजेचं आहे. यात जी वारंवार एकच क्रिया करणारे, केलेली गोष्ट विसरून पुन्हा तीच क्रिया करणारे, स्वछता याचं किडा इतका खोलवर रुजलेलं असते की, प्रत्येक गोष्टीतून जर्म येतील, नुकसान होईल, आजार होईल याची भीती असते. पैसे सुद्धा धुऊन वाळू घालणारी एक स्त्री होती, तिच्या या वागणुकीतून हत्या झाली होती. आपलें मानसिक आजार ओळखून डॉक्टर यांचा सल्ला नक्की घ्यावं. जसे शरीराला आजार होतात. मनालाही होतात. ते वाईट नसते. सर्दी -तापासारखे होतात जातात. पण हे वेळेवर लक्षात येन आवश्यक आहे. आपण असू तर जग आहे, समाज आहे, प्रेम आहे, नाते आहे. प्रत्येक व्यक्तीच जन्म काहीतरी बनून दाखवायला झालेलं असते. तसं ट्यालेंट प्रत्येकात उपजत असते. फ़क्त ते ओळखता यायला हवे. तुम्ही खूप खास(स्पेशल) किंमती आहात. याची जाणीव ठेवा. आयुष्य यालाच म्हणतात. जिथे थोडं त्रास, दुःख, अडचणी, ब्रेकअप, अपयश असते. प्रश्न म्हणजे आयुष्य.उत्तर सोडवणं म्हणजे आपलं ‘लढणं’ असते. सुखाचे, गोडाचे दिवस रोज असतील तर जीवन निरस होईल. वेगवेगळे अनुभव यायलाच हवे त्यातच गंम्मत दडलेली असते. मन, हृदय, विश्वास, नाती तुटले की त्रास होणे स्वाभाविक आहे. व्हायलाच हवं त्रास. ज्या जागेला त्रास, वेदना होत नाही ते जागा प्यारलाईज्ड होते. मग वेदना, दुःख फ़क्त म्यानेज करायचं तंत्र शिका. जीवन खूप सुंदर आहे. मरायच्या आधी बाहेर निघून बघा आकाशात, हवेचा अनुभव घेऊन बघा. निसर्ग किती सुंदर आहे. इतकं सुंदर जग सोडून का जायचं? फ़क्त अडचणी, दुःखामुळे. कधीच नाही. काम जशी ढकलता, तसं मनातले आत्महत्याचे विचार पुढे पुढे ढकलून द्यायचे. मूड बदलतात, इच्छा बदलतात. राग निवळून निघालं की पुन्हा जगायची इच्छा होते.फ़क्त ते दोन मिनिट म्यानेज करा. बाहेर निघा.बागेत जा. काहीही करा पण आत्महत्या करू नका.जिवन्त असू तर हजार उपाय सापडतील. न लढता आपण हार पत्करणारे वीर नाही.जिंकून दाखवायचं धाडस आहे तुमच्यात. खुश राहा. खुप हसा. काळजी घ्या.
आत्महत्या रोखण्यासाठी 10 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक ‘आंतरराष्ट्रीय आत्महत्येचे प्रतिबंधन ‘या नावाने एकत्रित येण्याचे 2003 पासून सुरु करण्यात आले आहे.
                                 प्रा. प्रिया मेश्राम
                              मो:-7588296094