माहेरी चाललेल्या महिलेचे बस प्रवासादरम्‍यान दीड लाखाचे दागिने केले लंपास

26

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.13डिसेंबर):-माहेरी चाललेल्या महिलेचे बस प्रवासा दरम्‍यान अज्ञात चोरट्यांनी बॅगेतून दीड लाखाचे दागिने लंपास केल्‍याची घटना घडली आहे.याप्रकरणी केज पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात बसमधून दागिने चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे महिलांची दागिने चोरणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या दरम्‍यान बसमधून प्रवास करताना १ लाख ४७ हजार ३५० रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना बीडच्या मांजरसूंबा- केज प्रवात घडली आहे.

माहेरी जात असताना दागिने लंपास

माजलगाव शहरातील शिक्षक निळकंठ चव्हाण यांच्या पत्नी उषा चव्हाण त्यांच्या माहेरी येळंबघाट येथे जात होत्या. केज येथून त्या लातूर- औरंगाबाद बसने प्रवास करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांची पर्स लांबविली.