शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय कुस्ती (पुरुष व महिला ) स्पर्धांचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे आयोजन

30

✒️कराड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कराड(दि.13डिसेंबर):-शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आंतरविभागीय कुस्ती (पुरुष व महिला) स्पर्धा (2022-23) चे आयोजन दि. 15 व 16 डिसेंबर 2022 रोजी वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे करण्यात आले आहे. या स्पर्धांचे उदघाटन दि. 15 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता प्रमुख पाहुणे महाराष्ट्र केसरी पैलवान श्री चंद्रहार पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री रामभाऊ कणसे, माजी शारीरिक शिक्षक, वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड हे भूषविणार आहेत. तर प्रमुख उपस्थिती म्हणून शिवाजी शिक्षण संस्था, विद्यानगर, कराडच्या उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर, कराडचे जनरल सेक्रेटरी मा. प्रकाश पांडुरंग पाटील ( बापू ) असणार आहेत.

कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी स्पर्धक (पुरुष व महिला) सदर स्पर्धेत सहभागी होणार आहेत. विविध वजन गटात पुरुषांच्या कुस्ती स्पर्धा फ्री स्टाईल, ग्रीक आणि रोमन प्रकारात तर महिलांच्या कुस्ती स्पर्धा फ्री स्टाईल प्रकारात होणार आहेत. तरी क्रीडा रसिक व कुस्ती रसिक यांनी मैदानावर बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी केले आहे.

कोणाला हरवून नाही तर सर्वांना सोबत घेऊन जगणारा जनसाहित्यिक : बंडोपंत बोढेकर