बारामती तालुक्यात कडक लाँकडाऊन करावे- सुशांत गोरवे यांची मागणी

37

 🔹अजित दादा पवार यांना निवेदन सादर

✒️बारामती(पुरोगामी संदेश नेटवर्क)

बारामती(दि-12जुलै):-काही दिवसांपूर्वी बारामती ही कोरोना मुक्त झाली होती,त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते,परंतु अचानक बारामती कोरोनाचे पेंशट सापडण्यास सुरुवात झाली आणि बारामतीकर चिंताजनक वातावरण निर्माण झाले,त्यामुळे बारामती तालुक्यात कडक लॉकडाउन करण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन नँशनल शोशालिस्ट पार्टी युवक आघाडीचे प्रदेशअध्यक्ष सुशांत गोरवे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,बारामती मध्ये आता खरी लाँकडाऊनची गरज आहे, अत्यावश्यक सेवा सोडून बारामतीमध्ये कडक स्वरुपाचे लाँकडाऊन टाकावे,१२जुलै रोजी सकाळी 9 कोरोना पाँझीटीव्ह रुग्ण सापडल्यावर येणाऱ्या 25 जणांचा अहवाल काय येतो याकडे लक्ष होते परंतु 25 पैकी ९ जणांचे अहवाल पाँझीटीव्ह आले आहेत तर १६ जणांचे अहवाल  हे निगेटिव्ह आले आहेत.
     बारामतीकरांसाठी हि अत्यंत धोकादायक गोष्ट आहे कोरोना ची साखळी तोडण्यासाठी बारामतीमध्ये कडक लाँकडाऊची गरज आहे,असे मा.सुशांत गोरवे यांनी निवेदनात सांगितले आहे. अशी माहिती मीडिया प्रमुख नशीब झाडे यांनी दिली.