74 लाख रुपये सेवागिरी चरणी अर्पण

54

✒️नितीन राजे(खटाव प्रतिनिधी)

पुसेगाव(दि.24डिसेंबर):-जिल्हा सातारा तालुका खटाव येथील परमपूज्य श्री सेवागिरी महाराज यांच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित रथोत्सवास भाविकांनी तब्बल 74 लाख 18 हजार 485 रुपये अर्पण केल. तर परकीय परकीय चलन देखील सेवागिरी चरणी अर्पण करण्यात आले.

पुसेगाव मधील नगर प्रदक्षिणेनंतर रथ मंदिरामध्ये आला नोटांनी भरगच्च भरलेल्या रथावरील नोटांच्या माळा खाली उतरवून त्या नारायणगिरी हॉलमध्ये मोजण्यासाठी बंदोबस्तात आणण्यात आल्या. रात्री 12ते पहाटे 4 वाजेपर्यत रथावरील सर्व नोटांची मोजणी श्री सेवागिरी देवस्थानचे चेअरमन संतोष उर्फ बाळासाहेब मुकुटराव जाधव, गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, डॉ.सुरेश जाधव, रणधीर जाधव, नागरिक, पुसेगांव पोलिस स्टेशन पोलिसांच्या करण्यात आली.

या वेळी महाराष्ट्र बॕक,भारतीय स्टेट बॕक , जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॕक व पुसेगांव येथील पतसंस्थाचे अधिकारी कर्मचारी नोटा मोजणेचे काम करत होते. पंचनामा होवुन सर्व रक्कम श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या बॕक खात्यामध्ये जमा करणेसाठी सर्व रक्कम बॕकेच्या ताब्यात देणेत आली. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी व जास्त दिवस भरणारी यात्रा म्हणून श्री सेवागिरी यात्रेचे नावलौकिक आहे.