राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी तर्फे नागपुर हिवाळी अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निलंबान रद्द करण्यासाठी परभणीत धिक्कार आंदोलन

102

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.24डिसेंबर):-नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पाटोंचे प्रदेशाध्यक्ष आ जयंत पाटील यांच्याविरूध्द केलेल्या सभागृह निलंबनाच्या कार्यवाहीच्या निषेधार्थ पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी परभणीच्या वतीने धिक्कार आंदोलन करण्यात आले.यामध्ये सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.

काल २२ डिसेंबर रोजी नागपूर येथील अधिवेशनात आ. पाटील यांचे निलंबन करण्यात आले, मुळात आ पाटील हे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. परंतु लोकशाहीचा व सत्याचा आवाज दाबण्याचे काम भाजप सरकार नेहमीच करत आलेले आहे. याच अनुषंगाने या सरकारने आ पाटील यांचे जाणीवपूर्वक अधिवेशन होई पर्यंत दोन्ही सभागृहातून निलंबन केले आहे. याच निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. आ. पाटील यांच्यावरील निलंबन तात्काळ रद्द करून त्यांना सन्मानपूर्वक सभागृहात प्रवेश द्यावा अन्यथा येणाऱ्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी परभणीच्या वतीने मोठ्या प्रमाणात लढा उभारून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के महिला जिल्हाध्यक्ष भावनाताई नखाते, अजयराव गव्हाणे. अनिल नखाते, इमरान लाला, ओबोसी शहर जिल्हाध्यक्ष कृष्णा कटारे, नासेर शेख बाबा कोल्हे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुमंत वाघ, किरण तळेकर, सिद्धांत हाके,संयम जैन, नागेश शिराळे, अल्पसंख्यक शहर जिल्हाध्यक्ष बाबा पठाण, पाथरीचे नगरसेवक अलोक चौधरी,नितेष भोरे,गोंविद हारकळ,बाळू राऊत, गंगाधर यादव, संदिप हिवाळे, श्रीकांत देशमुख नदोम काजी, शेख अहेमद अजिक्य हिवाळे, शेख मोहसीन, शेख अधर, ऋषिकेश मुरमुरे, अमोल वाकळे, रवि भोकरे, विशाल वाव्हूळे राजेश कदम, रहेमान शेख, आकाश कदम,पाथरी तालुकाध्यक्ष मीराताई सरोदे, विधानसभा अध्यक्षा निर्मला लिपने, रेखा मनिरे मानवत तालुकाध्यक्ष मीरा वानखेडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.