महिलांमधील डिप्रेशन व उपाय

37

            🔸विशेष लेख🔸

एका अहवाला नुसार भारतीय स्रिया, तरुणी यांच्या मध्ये डिप्रेशन अर्थात ताण तणावांचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात दिसून येते. हसत खेळत, आनंदी राहणारी महिला सुद्धा डिप्रेशन मध्ये असु शकते. या महिलांच्या डिप्रेशन मुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. कित्येक महिलांना डिप्रेशन असुन सुद्धा मान्यच करत नाहीत. याचे सुद्धा अनेक कारणे आहेत. भारतीय संस्कृती चा विचार केला तर मुलगी जन्मापासून च तिच्या वर मुलीचे अर्थात कमकुवत पणाचे संस्कार घातले जातात. लहानपणीच्या खेळण्या पासून तर तारुण्यां पर्यंत वेगळे संस्कार घालून वेळोवेळी मुलीला मुलीची जाणीव करून दिली जाते, मुलीची व मुलांची खेळणी वेगळी असतात, त्यांना बोलणे वेगळे असते, लहान पणा पासून त्यांना कामे सुद्धा वेगवेगळी सांगितल्या जातात. मुलींना सरासरी खेळणी जरी आणायची तर स्वयंपाकाशी संबधीत असतात मुलाला खेळणी बंदूक, कार, गाडी सारखे खेळणे देऊन लहानपणापासून मुलींच्या मना मध्ये दुय्यम भावना पेरल्याने अनेक तरुणी व महिला डिप्रेशन मध्ये जातात. कोणी कोणी वाढत्या वयासोबत होणारे शारीरिक बदला मुळे डिप्रेशन मध्ये असते, कोणी कोणी वयात येताना निर्माण झालेल्या अडचणी मुळे डिप्रेशन मध्ये असते. कोणी कोणी आपल्या विषयी लोक काय म्हणतील म्हणून डिप्रेशन मध्ये असतात, शारिरीक बांधा, रंग या वरून सुद्धा अनेक स्रिया व तरुणी डिप्रेशनमध्ये असतात. कारण लहान पणा पासून मुलींच्या डोक्यामध्ये त्याच पद्धतीने पेरले जाते. लहानपणा पासून दुय्यम गोष्टी पेरल्या मुळे कित्येक महिला व्यक्त सुद्धा होत नाहीत. मनामध्ये घुटमळ करून जगत असतात. वयात आल्या नंतर अनेक तरुणी मासिकपाळी विषयी सुद्धा बोलणे टाळतात, मासिकपाळी विषयी सखोल असे ज्ञान नसल्याने त्या विषयी सुद्धा डिप्रेशन मध्ये जाणाऱ्या तरुणी व महिलांची संख्या जास्त आहे. वरील गोष्टींचा आपण विचार केला तर महिलांनच्या मनामध्ये दुय्यम भावना पेरली गेली म्हणून एक गट डिप्रेशनमध्ये जातो.
महिलांना डिप्रेशनमध्ये जाण्याची दुसरी बाजु जर तपासली तर अपेक्षा भंग होणे, प्रेमामध्ये विश्वास घात होणे, जवळच्या मानसाचे अचाकन निघून जाणे, अपेक्षित यश अपेक्षित वेळेत न मिळने, अशा पद्धतीचे सुद्धा कारणे डिप्रेशन मध्ये जाण्याचे असु शकतात. डिप्रेशन ही एक माणसिक बिमारीच आहे, व्यक्ती चांगली दिसत असली तरी डिप्रेशन मुळे ती मानसिक कमकुवत झालेली असते. एकदा माणसिक कमकुवत झालेली व्यक्ती मानसिक पुर्वस्थिती मध्ये येण्यासाठी खुप वेळ लागतो कधी कधी परिस्थिती नियंत्रणा बाहेर जाऊन डिप्रेशन चे गंभीर परिणाम आपल्याला बघायला मिळतात. आपण डिप्रेशन चा जर विचार केला तर अनेक आश्चर्य कारक गोष्टी समोर येतात. त्या गोष्टी जर सर्वसामान्य मानसाला सांगितल्या तर संबधीत व्यक्ती डिप्रेशन मध्ये आहे यावर त्याचा विश्वासच बसत नाही. आपण जर बघितलं तर सतत एकच विचार करणाऱ्या महिला या सुद्धा डिप्रेशन याच गटामध्ये मोडतात, एखाद्या महिलेचा अपेक्षा भंग झाला, किंवा प्रेमामध्ये, नात्यामध्ये कोठेही विश्वास घात झाला तर ती महिला डिप्रेशन मध्ये जाते. सतत एकच विचार करते. संबंधित प्रकरणातुन बाहेर येण्यासाठी सतत एकच एक तोच तो विचार करून ती अजून त्याच प्रकरणात गुंतत जाते, एवढी गुंतुन जाते की तीला संबंधित प्रकरण विसरायलाच शक्य होत नाही. मग ती कधी कधी मनाला समजवण्याचा प्रयत्न करते, त्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते, परंतु ते शक्य होत नाही. मग जर ती नाराज असेल आणि एखाद्या समजदार व्यक्तीने तिला नाराजी बद्दल विचारले आणि तिने चिडचिड केली तर ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये च आहे अस समजावे. कारण डिप्रेशनमध्ये असल्यावर त्या व्यक्ती कडून वेगळीच प्रतिक्रिया वा हावभाव व्यक्त होत असतात. डिप्रेशन फक्त शब्दातून कळत नाही तर त्या व्यक्तीचे हावभाव, प्रतिक्रिया, सोशल मिडीयावर पोस्ट, स्टेटस यावरून सुद्धा त्या व्यक्तीच्या मानसिकतेचा आढावा आपल्याला घेता येतो. नकारात्मक स्टेटस ठेवणाऱ्या, नकारात्मक गोष्टिंचा जास्त उल्लेख करून ते सकारात्मक आहे असे म्हणणाऱ्या तरुणी आणि महिला डिप्रेशनमध्ये असतात. एखाद्या महिला वा तरुणी आपल्याला दिसते आहे ती कुठे तरी गहन विचारात किंवा वेगळ्याच दुनियेत आहे आणि आपण त्यांना सांगितले की तुला काही तरी अडचण आहे, तुझी माणसिक स्थिती बरोबर नाही आणि तिच्या कडून जर मी चांगली आहे, मलाच काहीच झाले नाही, मी सक्षम आहे अशा प्रकारची पण मोठ्या आवाजात भावनिक होऊन, कठोर मनाने जरी प्रतिक्रिया आली तरी ती डिप्रेशन मध्ये असते. ती जोरजोरात सांगण्याचा प्रयत्न करते मी स्ट्रॉग आहे, मला कोणाचीच काही गरज नाही हे जरी ती ओठाने बोलत असली तरी तिच्या मनामध्ये झालेला विश्वास घात रेंगाळत असतो. म्हणून तीने कितीही मनाला समजावले, कितीही मोठ्याने बोलुन दाखवले मला कोणाचीच गरज नाही, मी चांगली आहे, मी जगु शकते, तेव्हा अस समजावं कि तीच्या मनावर खुप मोठा घाव आहे. आणि तो घाव वेळोवेळी ताजा होत असतो. मी चांगली आहे हे नॉर्मल आवाजतही सांगु शकते पण त्या शब्दांचा उच्चार वेगळ्या पद्धतीने झाला तर अस समजावं ती कोणाकडून तरी दुखावल्या गेली, मला कोणाचीच गरज नाही हे वेगळ्या टोनीक मध्ये, जास्त जोर देऊन जर बोलत असेल अस समजावं कि तीने कोणाला तरी आधार मानला होता पण तेथे विश्वास घात झाला. मग तो प्रेम, नातेवाईक, वा ईतर कोणत्याही प्रकारातील असु शकतो. मग अशा पध्दतीने भारतीय बहुतांश महिला डिप्रेशनमध्ये आहेत. लग्नानंतर अनेक जबाबदाऱ्या, काम, आईवडीलांचा विचार, घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग न होणे, आपल्याला असलेले छंद न जोपासता येणे यामुळे सुद्धा महिला डिप्रेशनमध्ये असतात. लग्नानंतर पतीला सांभाळून सासु सासऱ्यां सोबत राहताना काही चुकणार तर नाही, वैवाहिक जिवन जगताना काही अडचणी तर येणार नाहीत असे विचार करून सुद्धा महिला डिप्रेशन मध्ये जातात. शिक्षण घेतले, घरचे लग्न करून देणार, सासरचे लोक शिक्षणाचा फायदा करू देतील नाही करू देणार म्हणून मुली डिप्रेशन असतात. डिप्रेशन मध्ये असल्याने चिडचिड होते, केलेले काम प्रभावी पणे मांडता येत नाही अथवा त्याचा फायदाही होत नाही. जसे एक तरुणी खुप मेहनत घेते, सतत ती तीचे काम करत राहते, जास्त कोणाशी संपर्क ठेवत नाही. तरीही तिला यश मिळत नाही कारण ती मेहनत तर करते, परंतु डोक्यात अनेक विचार असल्याने डिप्रेशन असल्याने ती त्या मेहनतीचे रुपांतर यशामध्ये करण्यासाठी अपयशी ठरते. मग अपयश आले की पुन्हा तेच मी कितीही केले तरीही मला अपयश मिळतेच, माझ्या मनासारखं होतच नाही, मी काहीही केले तरी ते पुर्ण होतच नाही हे सुद्धा डिप्रेशन चे लक्षण आहे.
एखादी तरुणी किंवा महिला आपला भाऊ, वडील, आई, पती, बहीण किंवा ईतर कोणतीही जवळच्या व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त जिव लावत असेल किंवा प्रमाणापेक्षा जास्त तिरस्कार करत असेल तरीही हे डिप्रेशन चे लक्षण आहे. कारण प्रमाणापेक्षा जास्त लावण्याचे कारण त्या महिला वा तरुणीच्या मनात कुठेतरी भिती, चुकीचे विचार असतात म्हणजे च डिप्रेशन असते आणि भविष्यात जर काही झाले तर माझे लोक माझ्या पासून दूरावू नये अथवा माझ्या बाजूने उभे रहावे म्हणून ती नाते जपण्याचा प्रयत्न करते पण डिप्रेशन मात्र तिला कायम असते. तीच गोष्ट तिरस्काराची आहे. जर ती कोणाचा प्रमाणापेक्षा जास्त तिरस्कार करत असले तर तिच्या मनात त्या व्यक्ती विषयी चुकिची भावना तयार झालेली असते म्हणून ती तिरस्कार करत असते. हे सर्वसाधारण लक्षण असतात डिप्रेशन ओळखून संबधीत महिला व तरुणीला त्यातून बाहेर काढण्यासाठी. आता डिप्रेशन अनेक माध्यमातून येते. पण हे दूर कसे करायचे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. काही महिला, तरुणी व्यक्त होत नाहीत, कोणाला काहीच सांगत नाहीत तरीही त्यांना बाहेर काढणे गरजेचे असते अशा वेळी काय करावे. सर्वात महत्त्वाचे लहान पणा पासुन जर सकारात्मक शिकवण दिली तरी डिप्रेशन मध्ये जाण्याचे प्रमाण खुप कमी होते. परंतु सध्या ज्या महिला आहेत तरुणी आहेत यांना डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी एक मंच असा हवा जेथे त्या मनसोक्त व्यक्त होतील. जसे घरात महिला व तरुणीचे भाऊ, आई, वडील, बहिण पती यांच्या सोबत खेळी मेळीच्या वातावरणामध्ये असते, आईला बऱ्याच वेळा वाटतं मुलगी सर्व काही आपल्याला सांगते, मैत्रिणीला सुद्धा तसच वाटते आपली मैत्रीण आपल्याला सगळं काही सांगते पण चांगले हसत खेळत बोलणे म्हणजेच सर्व काही सांगणे असे मुळीच नाही. कारण आपण समाजात वावरताना वेगवेगळ्या भुमीकेसोबत वावरत असतो. जसे भाऊ भावाची भुमिका, आई आईची भुमीका, वडील वडीलांची भुमिका, मैत्रीण मैत्रिणीची भुमिका, पती पतिची भुमिका बजावत असतो. या भुमिकेसोबत वावरताना महिलेला व तरुणीला जबाबदारी सोबतच काही बंधनाचे पालन करते. म्हणुन महिला किंवा ती तरुणी मनातील सगळ्याच गोष्टी सांगत नाही. ज्या तरुणी महिला मनातील प्रत्येक गोष्ट कोणाला तरी सांगतात त्या डिप्रेशन मध्ये जात नाहीत अथवा लवकर बाहेर येतात. परंतु न सांगणाऱ्या तरुणी महिला मनात असलेल्या, दाबुन ठेवलेल्या भावने भोवती घुटमळत बसतात म्हणून जास्त डिप्रेशन वाढत असते. डिप्रेशन मध्ये असलेल्या महिला किंवा तरुणीला बाहेर येण्यासाठी कोणतीच भुमिका नसलेली माणसाची गरज असते जेथे ती मनसोक्त व्यक्त होईल. अनेक महिला डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी गाणे ऐकतात, कोणी लिहते, कोणी आवडीचे कार्यक्रम बघते पण त्यामुळे डिप्रेशन मधून बाहेर येता येत नाही तर फक्त मनाच्या समाधाना साठी केले जाते. कारण गाणे ऐकून झाले, लिहुन झाले की पुन्हा तिच गोष्ट डोक्यात येते. म्हणून महिलांना डिप्रेशन पासून बाहेर काढण्यासाठी भुमिकाहीन व्यक्तीची गरज असते. ती व्यक्ती मिळाली तर सर्व काही नियंत्रणात येऊ शकते.

                                    ✒️ विनोद पंजाबराव सदावर्ते
                                       रा. आरेगांव ता. मेहकर
                                           मो: ९१३०९७९३००