देशातील राष्ट्रीय एकता संपविण्याचे काम काही जन करत आहे- जिल्हा संघटक प्रशिक सम्राट

  57

  ✒️जालना(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

  जालना(दि.21जानेवारी):- २६ जानेवारी ७४ वा प्रजासत्ताक दिन एक महान राष्ट्रीय गणतंत्र दिवस म्हणून १५ ऑगस्ट १९४७ ला मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो भारत स्वतंत्र झाला. इंग्रजांची गुलामी आणि अत्याचारापासून मुक्तता मिळाली. २६ जानेवारी १९५० ला देशात संविधानाची अमलबजावणी सुरू झाली. भारत एक प्रजासत्ताक देश बनला. याच दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसादने आपल्या पदाची शपथ घेतली. म्हणून या दिवशी देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले राज्याच्या सर्व राजधान्याच्या ठिकाणी हा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. परंतु मुख्य कार्यक्रम देशाची राजधानी दिल्लीत होतो. कारण दिल्ली देशाची राजधानी असल्याकारणाने प्रत्येक राष्ट्रीय कार्यक्रम दिल्ली मधूनच प्रसारित केला जातो.

  २६ जानेवारीला विजय दिवस म्हणून संपूर्ण भारतात ठीक ठिकाणी संविधानाचे वाचन करण्यात येते. त्यासाठी लाखोच्या संख्येने भारतीय मूलनिवासी नागरिक आनंद उत्सव म्हणून साजरा करतात यां कार्यक्रमचें थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरून दाखवण्यात येते किंवा रेडिओवरून ऐकविण्यात येते. राष्ट्रपती या ठिकाणी राजेशाही थाटात दाखल होतात. त्यांना २१ तोफांची सलामी दिली जाते.

  त्यानंतर भारताचे तिन्ही सेनेचे प्रमुख व त्या डिपार्टमेंटचे संबंधित वायुसेना जलसेना थल सेनाचें जवान, व राज्याचे पोलीस महानिदर्शक /संचालक पोलिस, शाळेतील मूलं मुली आदींची भव्य मिरवणूक निघते. अशाप्रकारे संविधान दिवस म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो.पण आज परिस्थिती बदललेली आहे देशातील लोक भूकमारीच्या मार्गावर आहेत महागाईने आपले जाळे संपूर्ण भारतात पसरले आहेत २०१४ पासून भारताचे चित्र वेगळं दिसत आहे, लोकांच्या नोकऱ्या गेल्या हाताचे रोजगार गेले वर्तमानपत्रामध्ये मोठी मोठी जाहिराती येतानां दिसतात १००० पोलीस भरती होणार असेल तर यासाठी ५० लाख मुले मुली रांगे मध्ये दिसतात पहिली अशी परिस्थिती नव्हती २०१४ च्या पहिले.

  भारतीय लोक २६ जानेवारी च्या दिनानिमित्ताने संविधानाच्या प्रतीची मिरवणूक पहाण्यासाठी रंगीत तालीम, लोकनृत्य आणि इतर सांस्कृतीक कार्यक्रम सादर करण्यात येत असे पण आज परिस्थिती प्रमाणात चालू आहे अशाप्रकारे एक भयाव्य वातावरण निर्माण झाले आहे देशाच् नेतृत्व प्रभावी व्हावे म्हणून प्रत्येक भारतीय नागरिक संविधान वाचवण्यासाठी धडपड करत प्रदर्शन करत आहे यासाठी लोक रस्त्यावर उतरून शक्ती प्रदर्शन करत आहे यावेळी भारत आणि भारताच्या अस्मितेला २०१४ ला लागलेला कलंक पुसून काढण्यासाठी अनेक संघटना न्यायपालिका विरोधी संघटना देशामध्ये वेगवेगळ्या धर्माचे व पंथाचे लोक पदयात्रा करताना दिसत आहेत देशातील राष्ट्रीय अखंडता एकता नष्ट करण्याचे काम काही विशेष लोक विशेष पद्धतीने करत आहेत त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये दुरुपयोग होताना दिसत आहे यामुळे देशाची प्रगती, अखंडता, एकता, शक्ती आणि प्रभाव जगासमोर येतो. अबाधित ठेवायचा आहे यामुळे देशबांधवाना जी प्रेरणा, उत्साह आणि गौरव भावना मिळते ती वंचितांसाठी प्रकाश मय झाली आहे.

  प्रकाश प्रजासत्ताक एकत्र येण्याच्या दिशेने सत्तेपासून विभक्त दिनाच्या पूर्वसंध्येला लाल किल्ल्यावर वरून बीजेपी चे प्रधानमंत्री देशाला संबोधीत करताना संदेश देतात की सर्वांची साथ सर्वांचा विकास भाई और बहनों मै देश नही बिकने दूंगा हे एक अंत्यत महत्त्वाचे प्रसारण म्हणेजे जुमला बाजी म्हणावे लागेल सर्वांची साथ सर्वांचा विकास हे वाक्य देशाला विनाशाकडे घेऊन जाण्याचा मार्ग आहे. मूलनिवासी बहुजनांचा भारत आपला भारत १५ ऑगस्ट, १९४७ रोजी स्वतंत्र झालेला असला तरी २६ जानेवारी, १९५० ह्या दिवशी तो लोकशाही राष्ट्र म्हणून ह्या जगात उदयास आला. आजच्या तथाकथित काही मनुवादी सरणीच्या लोकांना भारताची राज्यघटना मान्य नाही हे भारतातल्या लोकांचे दुर्भाग्य होय या भारताचे नॉलेज ऑफ सिम्बॉल भारतीय वंशाचे भारतीय मूलनिवासी थोर विद्वानवादी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर ह्यांनी भारतीय राज्यघटना तयार केली म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे संबोधले जातात. परंतु इथल्या काही जातीयवादी मनुवादी व्यवस्थेला ही बाब पचनी पडत नसल्यामुळे त्यांनी संविधानाची प्रत जाळण्याचें मा पाप करण्याचे काम केले. इतिहास साक्षीला आहे आज भी भारतीय संविधानाने दिलेले प्रधानमंत्री ह्या दिवशी सकाळी इंडिया गेटवर जाऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहातात.

  त्यानंतर सकाळी सात वाजता राष्ट्रपती विजयचौकात येतात. तेव्हा पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि तिन्ही भारतीय सैन्यदलांचे प्रमुख त्यांचे स्वागत करतात. बँडवर राष्ट्रगीताचे वादन होते. मोठी कवायत केली जाते. त्यावेळेस रणगाडे, तोफा, रॉकेट्स आदी युद्धसामुग्रीचे भव्य प्रदर्शन केले जाते. परंतु आपला भारत विविधतेने जरी नटलेला आहे. तरी ही भारतीय संविधानाची देण समजावी व त्यामुळेचं भारत हा अखंड आहे. वेगवेगळ्या मनुवादी विचारसरणीच्या महाभागाने भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचे षडयंत्र करत आहेत त्यात निवडक मनुवादी संस्कृतीचे पिलावळ खैबर खिंडीतून आलेले महाभाग शौर्य गाजवणाऱ्या भारतीय वंशाच्या मूळनिवासी बहुजन समाजाला गुलामीच्या बंधनात अडकवण्याचे काम पद्धतशीरपणे त्याचे नीयोजित कार्यक्रम केले जात आहे देशात लोकशाही असणे हा नागरिकांना मिळालेला खूप मोठा स्वतंत्र्याचा पुरस्कार आहे.

  आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो, लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले. ते बलिदान आपण व्यर्थ जाऊ देता कामा नये. यासाठी संविधानिक मार्गाने आपली लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेले सरकार होय आम्हाला आमचा भारत देश प्रगतीपथावर न्यायचा आहे. सर्व भारतीयांची प्रगती करायची आहे. प्रजासत्ताक दिन हे त्याचेच एक जिवंत उदाहरण आहे. ८ नोव्हेंबर २०१६ ह्या दिवशी गरिबांचे काय हाल होतील याचा जराही विचार न करता सार्वजनिक नोटबंदीची हिटलर वादी घोषणा जाहीर केली. त्यावेळी राज्यावर येणारी परकीय आक्रमण सोडल्यास इतर संकटे ही मूळनिवासी बहुजन समाजाचा पिछा सोडत नव्हती. त्यावेळीही सामन्य लोक माझे शेत पिकणार नाही, माझे लेकरं बाळे खाण्यापिण्या वाचून मरतील याचा थोडाही विचार केला मनुवादी व्यवस्थेच्या प्रमुखांनी केला नाही.

  मात्र अर्थशास्त्रज्ञ, सेवादाते, व्यापारी आणि राज्यकर्ते एका वर्षाच्या पावसाचे चार महिने हे असे गेलेत याचा पुढिल वर्षावर, उद्योगधंद्यावर, परकीय व्यापारावर आणि एकंदरच राज्याच्या आर्थिकस्थितीवर तिजोरीवर काय परिणाम होईल याचा विचार ही केला नाही आठ नोव्हेंबर २०१६ ला चलनबंदीच्या स्वरूपात नैसर्गिक नाही पण एका प्रकारची सुनामी भारतातल्या भारतीयावर कोसळली आणि ती म्हणजे कोरोना वैश्विक महामारी त्याचा वैयक्तिक आयुष्यावर, कौटूंबिक कार्यप्रसंगांवर काय परिणाम होतोय याविषयी थोडा ही विचार केला नाही.

  प्रचंड त्रास भारतीय मूलनिवासी लोक आपल्या लेकरा बाळा सहित होणाऱ्या दुःख आणि त्या दुःखातल्या यातना न सांगता निमूटपणे सोसत राहिली त्यातच काही ठराविक बालिश प्रवृत्तीच्या पोलिसांचा ही अत्याचार वाढत होता या गोष्टीवर निर्बंध लावण्यासाठी असेचा किरण म्हणून लोक देवला विनंती करू लागले पण देवळातले देव सुद्धा आतून मंदिराच्या कड्या लावून झोपले त्यांचे असलेले पुजारी मंदिराला बाहेरून टाळे मारून पळून गेले त्या वेळी मदतीला धावून आले असतील तर तुमच्या आणि आमच्या मधील लपलेले निस्वार्थ मनुष्य अचानक घातलेली नोट बंदी हे कोणाच्या फायद्याची होती एवढा भ्रष्टाचार होऊनही लोकांनी संविधानाचा आदर केला.

  परंतु या अचानक चलनबंदीचा उद्योगधंद्यांवर, कामगारांवर, शेतीवर, शेती आधारित व्यवसायांवर याचा काय परिणाम होईल याचा विचार केला नाही.आपल्यापैकी कुणाचे स्वतंत्र उद्योगधंदे असतील, कुणी शेअर बाजारात गुंतवणून करत असेल, कुणी परकीय गुंतवणूकीच्या क्षेत्रात असेल, कुणी इतरांच्या उद्योगधंद्यात कामगार म्हणून काम करत असेल किंवा कुणी नुसतंच या क्षेत्रात पाऊल ठेवले असेल अशा लोकांचा सुद्धा विचार केला नाही. ह्या नोटबंदीमुळे अनेक मुलींचे आयुष्य उध्वस्त झाले त्यांना लग्नासाठी पैसे मिळत नसल्याने अनेक मुलींच्या आई-वडिलांनी पैशा अभावी त्यांचे उपचार न झाल्यामुळे मृत्यू पावले अशा सरकारला जनतेचा शाप लागल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या आत्म्यास शांती मिळो २६ जानेवारीच्या २०२३ निमित्ताने २०१४ हा काळा दिवस म्हणून घोषित करून इतिहासाच्या पानावर काळ्या अक्षराने लिहिला जाईल. जय हिंद जय भारत