पाळधी – आर्यन स्कूल मध्ये आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

27

🔹विद्यार्थ्यांनो विज्ञानाच्या युगात प्रगतीचा आलेख उंचावर पोहोचवा! – व्याख्याते सतिष शिंदे

✒️पी.डी पाटील सर(धरणगाव प्रतिनिधी)

धरणगाव(दि.28फेब्रुवारी):- विज्ञान दिनानिमित्त आर्यन इंटरनॅशनल स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, प्रदर्शना च्या प्रमुख अतिथी स्थानी शिव व्याख्याते सतीश शिंदे , विज्ञान विषयी आवड असणारे तुषार परदेशी , पवन मोरे , आर्यन स्कूल चे उपक्रमशील मुख्याध्यापक राष्ट्रीय शिक्षण रत्न प्राप्त अविनाश जावळे आदी उपस्थित होते,प्रमुख अतिथीच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.

विज्ञान प्रदर्शनात इ.४थी ते ७ वी चे विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता यात विद्यार्थ्यानी रूम हिटर, एअर कूलर,वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर हिटर, पवन चक्की,व्याकुम कलीनर, वेल्डिंग मशीन, मेटल डिटेक्टर, रिस्पिरोटरी सिस्टीम, रेन डिटेक्टर अलार्म, हिड्रोक्लोरिक जेसीबी,वॉटर अलर्ट अलार्म, भारतीय नकाशावर भारतातील राज्यांची राजधानी वर नवीन प्रकल्प तयार केले होते यासाठी विद्यार्थ्याना उज्ज्वला महाजन मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले , विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यानी बनविलेल्या वैज्ञानिक वस्तू बदल आपल्या मनोगतातून सतीश शिंदे यांनी आजचा विद्यार्थी हा उद्याच्या वैज्ञानिक असेल तसेच विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविणार आर्यन स्कूचे नाव लौकिक असल्याचे जाणीव विद्यार्थ्याना करून दिली.

तर तुषार परदेशी यांनी आपल्या आजूबाजूला निसर्गात प्रत्येक ठिकाणी विज्ञान असल्याचे उदाहरण विद्यार्थ्याना आपल्या मनोगतातून दिले, कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी आर्यन इंटरनॅशनल स्कूल चे संगीता बाहेती, रत्ना सपकाळे, स्वाती तायडे, प्रज्ञा जोशी, झुलाल जाधव, प्रदीप थोरात, नेहा फेड्रिंक्स,सोनाली पाटील, मनीषा माळी,पूनम नंनवरे ,शोभा सातव, सुरेश सोनवणे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्जवला महाजन यांनी तर आभार संगीता बाहेती यांनी मानले.