प्रभू श्रीराम जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी विश्वजीत सरनाईक यांची सर्वानुमते निवड

29

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

 पुसद(दि.28फेब्रुवारी):- येथील श्रीराम नवमी निमित्त होणाऱ्या भव्य दिव्य श्रीराम जन्मोत्सव व शोभायात्रेच्या आयोजन करण्यासंबंधी पार पडलेल्या बैठकीमध्ये प्रभू श्रीराम जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी विश्वजीत सरनाईक यांची सर्वानुमती निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. पुसद शहरात श्रीराम नवमी निमित्त निघणारी भव्य दिव्य शोभायात्रा जिल्ह्यात चर्चेचा व आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. आकर्षक देखावे, श्रीरामाची पालखी, श्रीराम मंदिर हटकेश्वर वार्ड येथून सुरू होणारी भव्य दिव्य शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गस्थ होत जल्लोषात श्रीराम नवमी साजरी केल्या जाते.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विश्व हिंदु परीषद, बंजरंग दल पुसद यांचे वतीने 30 मार्च रोजी साजरी होणारी श्रीराम नवमीच्या उत्सवाचे आयोजन नियोजना संबंधी आज सायंकाळी ७ वाजता श्रीराम मंदिर पुसद येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीरामाच्या आरतीने मिटीगची सुरुवात झाली. श्रीराम मंदिर चे जिर्णोद्धार करणारे स्वर्गीय सतिष बयास यांना मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर श्रीराम जन्मोत्सव समिती २०२२ चे अध्यक्ष डॉक्टर पंकज जयस्वाल यांनी मागील वर्षी ६ लाख ७१ हजार २३३ रुपये वर्गणी गोळा झाल्याचे व शोभायात्रेसह श्रीराम मंदिरात शेडसाठी झालेल्या खर्चाचा त्यापैकी ११ हजार शिल्लक असल्याचा तपशील सादर केला. उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून मंजूरी दिली.

डीजे मुक्त श्रीराम नवमी साजरी करण्याचा मानस भारत अण्णा पेन्शनवार यांनी बोलून दाखविला. मार्गदर्शन समिती मध्ये आमदार इंद्रनील नाईक, आमदार निलय , एडवोकेट आशिष , शरद मैंद, सुरेश गोफने, सुरज डुब्बेवार, निशांत बयास, लक्ष्मणदादा जाधव, अजय , विनोद जिल्हेवार, एडवोकेट उमाकांत पापीनवार, अभिजीत चिद्दरवार, डॉक्टर संजय , एडवोकेट विवेक, चिद्दरवार, डॉक्टर ,पंकज जयस्वाल, एडवोकेट अनिल ठाकूर , अशोक उंटवाल तर नियंत्रण समितीमध्ये गिरीश अग्रवाल, शरद मैंद, भारत पेन्शनवार , परमेश्वर जयस्वाल , अभिजीत चिद्दरवार , डॉक्टर संजय भांगडे , दीपक परिहार , विश्वास भवरे , प्राध्यापक सुरेश गोफणे , लक्ष्मणराव आगाशे तसेच शोभायात्रा समिती मध्ये निशांत बयास , महेश नाईक , रवी ग्यानचंदानी , ओमप्रकाश शिंदे , अभिजीत पानपट्टे , बालाजी कामीनवार , राजेंद्र भिताडे , विष्णू गुद्धटवार, सतीश कानडे , दीपक परिहार , स्वप्निल जयस्वाल ,एडवोकेट भारत जाधव , यांचा समावेश असल्याचे तसेच सुरक्षा समिती मध्ये मंगेश करण , किशोर पानपट्टे , विशाल कांबळे , अभिमन्यू शिंदे ,सतीश कानडे , अमोल साखरे , निरंजन गादेवार , सतीश कनोजे यांचा समावेश केला असल्याचे त्यासोबतच महिला समिती मध्ये सौ वासंती सरनाईक , कुमारी श्रद्धा सुरोशे , सौ सुनिता दगडपल्लेवार , सौ रेशमा लोखंडे , डॉक्टर रूपाली जयस्वाल , श्रीमती दिपाली जाधव यांचेसह सजावट समिती प्रमुख म्हणून रवी ज्ञानचंदानी , विजय पुरोहित , विनायक बोंपीलवार , नटवरलाल उंटवाल , विश्वास भवरे , रमेश डूब्बेवार यांची समिती गठित झाल्याचे तसेच कार्यालय समिती प्रमुख म्हणून एडवोकेट उमाकांत पापीनवार , अजय पुरोहित , अशोक बंनचरे , रमेश सोमानी , भारत पाटील यांचा समावेश असून निधी संकलन समिती मध्ये डॉक्टर संजय भांगडे , सतीश शेवाळकर , अभिजीत पानपट्टे , रवी ग्यानचंदाणी , नटवर उंटवाल यांची निवड झाल्याची घोषणा विश्व हिंदू परिषदेचे भारतआण्णा पेन्शनवार यांनी यावेळी घोषित केले.

या बैठकीमध्ये श्रीराम भक्तांनी साधक बाधक चर्चा करीत श्रीराम नवमी जन्मोत्सव समिती २०२३ च्या अध्यक्षपदी विश्वजीत सरनाईक व कार्याध्यक्ष म्हणुन निखील चिद्दरवार यांची तर कोषाध्यक्ष म्हणुन निलेश अग्रवाल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीस भारत पेन्शनवार, शरद मैंद, विनोद जिल्हेवार, अजय पुरोहित, डॉ. पंकज जयस्वाल, बालाजी कामीनवार, दिपक परिहार, श्रीकांत सरनाईक, अनिल ठाकूर, निशांत बयास, विजय पुरोहित, विशाल कांबळे, अँड भारत जाधव, धिरज पानपट्टे, योगेश राजे, बाळासाहेब उखळकर, परमेश्वर जयस्वाल, बाबा उंटवाल, अँड अर्जून ठाकूर, विक्रांत जिल्हेवार, कौस्तुभ धुमाळे, दिलीप रायपूरकर, अभिजीत पानपट्टे, स्वप्निल चिंतामणी, ईशान चव्हाण, स्वप्निल जयस्वाल, रणजीत सांबरे, किशोर पानपट्टे, वैभव उबाळे, वैभव फुके, दिलीप जांगिड, गिरीश अग्रवाल, किरण देशमुख, पांडुरंग उथळे, लक्ष्मण आगाशे, प्रशांत दमकोंडवार, अभिजीत बासटवार, शुभम काळबांडे यासह आणखी शेकडो रामभक्त उपस्थीत होते.