✒️शेगाव बु(पुरोगामी संदेश नेटवर्क)

शेगाव बु(दि.18जुलै):-चंद्रपुर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या वाहंगाव येथे दारुची लपून छपुन पोलीसांच्या डोळ्यात धूळ झोकुन देशी दारू ची विक्री करणाऱ्या गावात 1 महिन्यात तीन चार करवाई करण्यात शेगाव पोलिसांना यश मिळाले आहे ही काल (दी.17 जुलै) रोजी सुद्धा शेगाव पोलिसांनी करवाई केली
येथील देशी दारुचि सर्रास तस्करी तसेच  अवैध  करणारे आरोपी ग्यानी किसनसिंग अंधरेले व नानकसिंग बावरिया यांच्याकडे अवैध देशी दारुच साठा असलीची गोपनीय माहिती येथील ठानेदार श्री सुधीर बोरकुटे यांना मिळताच गोपनीय महितीच्या आधारे विशेष सापळा रचुन यांच्या जनावराच्या कोटया तुन 10 पेटी देशी कोकण संतरा 180 m l 480 नग 96 हजार रूपयाचा देशी साठा जप्त केला तर यात आरोपी श्री पुरुषोत्तम रामचंद्र मड़ावी वय 50 वर्ष राह वहानगांव , याला अटक करण्यात आले तर याचे खरे मालक आरोपी ग्यानी किसनसिंग मड़ावी , नानकसिंग बावरिया असल्याचे सांगण्यात आले तर हे आरोपी फरार असून यांना तत्काळ अटक करण्यात येणार असल्याचे ठानेदार श्री सुधीर बोरकुटे यांनी सांगितले.

विशेष म्हणजे वहानगावात देशी दारु ची विक्री सर्रास होत असल्याने या गावाकडे ठानेदार चे अधिक लक्ष असून या महिन्यात अधिक करवाया करण्यात आल्या तर सदर ही करवाई येथील ठानेदार श्री सुधीर बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात पी एस आयप्रवीण जाधव , सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक शिरसागर , श्री मनोहर खोब्रागडे , पोलिस शिपाई श्री रवि तुरणकर , प्रवीण जूनघरे , प्रदीप मोंढे , निकिता रासावर इत्यदिनी ही करवाई केली
या करवाई मुळे येथील दारू विक्रेते व दारू तस्करी करणारे यानचे अधिकच ढाबे दनानले असल्याचे समजले.

Breaking News, क्राईम खबर , चंद्रपूर, महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED