आता निसर्ग व पर्यावरणपूरक “बांस राखी” उपलब्ध

    44

    ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चंद्रपूर(दि.19जुुुलै):-पर्यावरणपूरक बांबूच्या विविध कलात्मक वस्तूंची निर्मिती करणाऱ्या “बांस” या देशातील अग्रगण्य स्टार्टअप द्वारा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा उत्सव बांस द्वारा निर्मित वैशिष्ट्यपूर्ण अशा कलात्मक राखीने साजरा करण्याचा संदेश पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दिला आहे.

             भारतीय संस्कृतीत राखीच्या सणाचे अनन्यसाधारण महत्व आहे. परंतु राखीच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात पर्यावरणासाठी घातक अशा प्लास्टिकचा वापर केला जातो. आणि सुमारे ४००० कोटी रुपयांचे चायनीज राखी भारतात प्रत्येक वर्षी घेतल्या जातात ज्यामध्ये प्लास्टिक चा वापर केला जातो.अशा स्थितीवर मात करण्यासाठी जनमानसात पर्यावरणपूरक राखीचा प्रचार-प्रसार व्हावा आणि पर्यावरणस्नेही मानसिकता सुद्धा वाढीस लागावी या उदात्त उद्देशाने बांस’ची चमू जोमाने राखी निर्मितीचे कार्य करीत असून यावर्षी राखीचा सण म्हणजेच भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक असलेल्या उत्सवाला पर्यावरण प्रेमाची सुद्धा जोड द्यावी आणि मोठ्या प्रमाणात बांस द्वारा निर्मित राखीचा उपयोग करण्याचे आवाहन बांस चमूने केले आहे. बांस टीम द्वारे संपर्क रहित होम डिलव्हरी सुद्धा दिलेली जात आहे त्यासाठी व्हॉटसअप ८६६९१६२८१६, ९८३४६२७०३१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर तसेच bans1919 या instagram व facebook पेज ला भेट द्यावी. भारतीय राखी घेऊन चिनी राखी का मात करायला उत्तम संधी मिळेल यासाठी बांस ला उत्तम सहकार्य व प्रोत्साहन द्यावे.