राष्ट्रवादी युवक काँग्रेस आष्टीचे शहर अध्यक्ष राहुल डांगे यांचा आमरण उपोषणाचा इशारा! @ ग्रामपंचायत दुकान गाडे बांधकामात झाला भ्रष्टाचार

33

✒️चामोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चामोर्शी(दि.11मार्च):- ग्रामपंचायत आष्टी ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली यांनी बांधकाम केलेल्या दुकान गाडयात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत या बाबतीत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आष्टीचे शहर अध्यक्ष राहुल डांगे यांनी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

आष्टी ग्राम पंचायतने सन २०१८ ते २०२१ या कालावधीत नियम धाब्यावर बसवून इमारतीच्या गाड्याचे बांधकाम केले परंतु या गाडे बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला. या गाडे बांधकामात भ्रष्टाचारात लिप्त असलेल्या अधिकारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी या करिता दि. २ मार्च २०२३ रोजी राहुल डांगे यांनी चामोर्शी तहसीलदार यांना उपोषणाचीची नोटीस दिली आहे. नोटीसची प्रत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी व चामोर्शी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांना दिले आहे.

सादर केलेल्या नोटीसात जिल्हा पातळीवरून नव्याने चौकशी समिती नेमून भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या अधिकारावर योग्य ती कारवाही करण्यात यावी अन्यथा दिनांक १ एप्रिल पासून आष्टी येथीलडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा राहुल डांगे (शहर अध्यक्ष-राष्ट्रवादी युवक काँग्रेस), नेमाजी डोंगरे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस) यांनी दिला आहे