कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

31

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.11मार्च):-शहरातील प्रसिद्ध पोदार जम्बो किड्स व ऑक्सफॉर्ड फौंडेशन स्कूल च्या वतीने अंतर राष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने गंगाखेड तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. या मध्ये सामाजिक कार्यकर्त्या मंजुषा दर्डा, सौ जयश्री रामप्रभू मुंडे, सौ प्रा. मेघा कदम, सौ किशोरी श्रीकांत भोसले, डॉ. मयुरी चांडक, सौ शुभांगी कडू, या कर्तृत्ववन महिलांचा सन्मान करण्यात आला तसेच सर्व महिला पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी बोलताना मंजुषा दर्डा म्हणाल्या मुलानं या स्कूल मध्ये अधूनिक दर्जेदार शिक्षणा बरोबर समाजिक मूल्यांचे शिक्षण दिले जात आहे ही अभिमानाची बाब आहे.

स्त्री पुरुष समानता या समाजिक मूल्यांची शिकवण नक्कीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून छोट्याशा विद्यार्थ्यां वर केली जात आहे यात शंका नाही. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती CBSS स्कूल चे प्रशिक्ष प्रा. प्रशांत माहुरकर (नांदेड) हे होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी वैशाली मॅम, जयश्री मॅम, करुणा मॅम, साधना मॅम, ऐश्यावर्या मॅम, कसबे सर, गोविंद सर यांनी परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य विष्णू मुरकुटे सर, सूत्रसंचालणं कीर्ती मॅम व शीतल मॅम यांनी केले तर आभार मोरे मॅम यांनी व्यक्त केले