✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.१९जुलै): चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काम करीत असलेल्या अन्य राज्यातील मजुरांना आपल्या गावी,आपल्या राज्यात, परत जायचे असेल तर त्यांनी आपल्या नावाची नोंद संबंधित वेबसाईट वर करावी, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने यासंदर्भात एक सूचना जारी केली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सध्या काम करत असलेल्या अन्य राज्यातील मजुरांना आपल्या स्वतःच्या राज्यात परत जायचे, असेल तर त्यांनी आपली नोंद https://migrant.mahabocw.in/migrant/form या वेबसाईटवर करण्याचे,आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
मायग्रंट फॉर्म नावाची ही वेबसाईट असून https://migrant.mahabocw.in/migrant/form यावर आपल्या नावाची नोंद करणे आवश्यक आहे.ज्या ठिकाणी अन्य राज्यातील कामगार कार्यरत असतील त्या आस्थापनाच्या प्रमुखांनी देखील कामगारांना या साठी मदत करावी, असे देखील आवाहन त्यांनी केले आहे.

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, स्वास्थ 

©️ALL RIGHT RESERVED