अन्यथा ओबीसी सुतार समाज हा बहुजन चळवळी पासुन अडगळीत पडेल!!

67

ओबीसी सुतार समाज हा ओबीसी प्रवर्गातील मोठा घटक आहे. सुतार समाजाला राजकीय हिस्सेदारीसाठी बहुजन म्हणजे ओबीसींच्या समूहात आणि वैचारिक प्रवाहात आल्या शिवाय पर्याय नाही, एकट्या सुतार समाजाला राजकीय प्रवाहात सहभागी होता येणार नाही, याचा सुद्धा विचार करण्याची नितांत गरज आहे. यासाठी सुतार समाजात खऱ्या अर्थाने वैचारिक समाज प्रबोधन करतांना जबाबदार असणारे स्वयंघोषित सुतार समाज नेते समाजात दिसत नाहीत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समुहासाठी संविधानात तरतूद केलेली असतांना त्याकडे दुर्लक्ष करण्याचे कटकारस्थान अनेक कलम कसाई धर्माधिकारी यांनी केले, ओबीसी समाजाला अंधभक्त बनविण्यासाठी केलेल्या त्याग, समर्पण सेवेच्या सन्मानासाठी महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार एक पूर्वापार तडीपार असलेल्या चारित्र्य हीन माणसांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी 25 लाख आध्यात्मिक ओबीसी भक्तांना 42 अंश तापमान असणाऱ्या रखरखत्या उन्हात त्यांना बसून ठेवण्यात आले. निसर्ग नियमानुसार त्यात 12/13 आध्यात्मिक ओबीसी भक्त मृत्यूमुखी पडले आणि पांचशे पेक्षा जास्त आध्यात्मिक भक्त विज्ञानाच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहेत.

ओबीसींना संविधानात दिलेले हक्क संवैधानिक अधिकाराचा एका बाजूला उपभोग घ्यायचा आणि दुसरीकडे संविधान संवैधानिक अधिकारा बद्दल सुतार समाजात वैचारिक समाज प्रबोधन करायचे नाही, याला तर निव्वळ दुटप्पीपणा म्हणतात. वास्तविक पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहु महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, शिवराय या सर्वंच महापुरुषांनी बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी आपलं संपुर्ण आयुष्य खर्ची घातले. याच महापुरुषांच्या विचारांचा प्रसार प्रचार ओबीसी सुतार समाजात होतांना दिसत नाही. महिलांना शिक्षणाचे महत्व पटवुन देणारे फुले दांपत्य ओबीसी समाजातील एक घटक असतांना ओबीसी समाजाने आज ही त्यांना मनापासून स्वीकारले नाही. उलट उच्चवर्णीय समाजाने त्यांच्या महिलांना शिक्षणाची दारे उघडे करून सर्वच क्षेत्रात गरुड झेप घेतलेली दिसते. ओबीसी समाजातील किंवा सुतार समाजातील किती महिला शिक्षण घेऊन उच्चपदावर अधिकारी म्हणून बसल्या हे गर्वाने सांगता येत नाही. ही शैक्षणिक वैचारिक कमतरता आहे हेच सुतार समाजाचे दुर्दैव म्हणावे लागेल.

ओबीसी सुतार समाजात महापुरुषांच्या विचारांची नितांत गरज आहे.*राज्यस्तरीय ओबीसी* सुतार समाजात ओबीसी संविधान जनगणना बद्दल समाज प्रबोधन न करता धार्मिकतेचा प्रचार *प्रसारावर* जास्तीत जास्त प्रमाणात जोर दिला जातो. आध्यात्मिक धार्मिकता हि वैयक्तिक पातळीवर असावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे परंतु, त्याचा सुतार समाजाला राजकीय हिस्सेदारी साठी कितपत उपयोग होईल याचा सुद्धा विचार करण्याची नितांत गरज आहे. याकडे समाजातील सुशिक्षित उच्चशिक्षित बुद्धिप्रामाण्यवादी, बुद्धिजीवी, सर्वगुणसंपन्न लोकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, रावबहादुर नारायण मेंघाजी लोखंडे, राजर्षी शाहूमहाराज आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, मान्यवर कांशीराम यांच्या क्रांतिकारी विचारांची चळवळ म्हणजेच बहुजन चळवळ समजली जाते. ती एका जाती धर्माशी नाते सांगणारी नाही तर “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हा संदेश देणारी आहे. म्हणून ओबीसीशी तिच्या सोबत जोडून घेतले पाहिजे होते. ते न घेतल्यामुळे शिक्षणातील,;नोकरीतील आणि राजकीय आरक्षणाला त्यांना मुकावे लागत आहे. म्हणूनच भिती वाटते की ओबीसी सुतार समाज बहुजन चळवळी पासुन अडगळीत पडेल. जमिनीवर उतरून वैचारिक समाज प्रबोधन करावे. अन्यथा ओबीसी सुतार समाज बहुजन चळवळी पासुन अडगळीत पडेल.

आध्यात्मिक चक्र व्युवात फसलेल्या ओबीसी सुतार समाजाला बाहेर काढून सामाजिक क्षेत्रात खऱ्या अर्थाने जमिनीवर शैक्षणिक, सामाजिक, वैचारिक व विकासात्मक चळवळ नेली पाहिजे. ओबीसी सुतार समाज जागृती अभियान जोरात राबविण्यासाठी तन, मन, धनाने जमिनीवर उतरणे गरजेचे आहे. त्यासाठी तोंडात साखर, पायाला भिंगरी आणि डोक्यावर बर्फ ठेवावे लागेल. तरच ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रातील नेते कार्यकर्ते साधारणतः दोन वर्षात ओबीसी सुतार समाजाचे सामाजिक क्षेत्रातील राज्यातील मान्यताप्राप्त नेते होऊन बहुजन चळवळीशी जोडल्या जातील. अन्यथा ओबीसी सुतार समाज बहुजन चळवळी पासुन अडगळीत पडेल.
सुशिक्षित बेरोजगार युवकांना नोकरी, छोटे मोठे उद्योग, सर्वसामान्य समाज बांधवांना व्यवसाय आणि रोजगार निर्मिती नसेल तर आर्थिकदृष्ट्या प्रगती कशी होईल. “मागीतल्याने मिळत नाही, संघर्षा शिवाय पर्याय नाही.” हे ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्याला, नेत्याला माहितीच नाही. असे मला वाटते. ५२ टक्के ओबीसी समाजाचे राज्यव्यापी आंदोलन उभे का राहत नाही. कारण विहिरीत नाही, तर पोहऱ्यात कसे येणार ?. मग मला अडाण्याला सांगा, ओबीसी सुतार समाज नेत्यांनी समाजहितासाठी जमिनीवर न उतरता समाजाचे नेते कसे बनतील? आणि बहुजन चळवळीशी कसे जोडल्या जातील.

ओबीसी सुतार समाजाने “डोळे बंद करून द्या टाळी आणि घ्या टाळी तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू फुलांच्या माळा” हेच समाजकार्य नसते. सामाजिक क्षेत्रातील सत्यावर आधारित तर्कशुद्ध समाज तत्वाच्या आधारावर तसेच सामाजिक वैचारिक आणि नैतिक मूल्यांच्या आधारावर समाज संघटना उभी राहिली तर इतिहासात तिची नोंद होईल अन्यता ५२ टक्के ओबीसी जातीतील किती टक्के जागृत होते. हा इतिहास लिहला जाईल. यासाठी मला कोणी मुर्ख म्हटले तरी मी माझे मत मांडत राहतो, कदाचित ते चुकीचे असू शकते. पण ते कसे चुकीचे आहे हे मला कोणी छातीठोक पणे समजावून सांगितले पाहिजे हीच माझी इच्छाशक्ती आहे. म्हणूनच विनंती करतो, बाबानो, ओबीसी सुतार समाज नेत्यांनी समाजहितासाठी जमिनीवर उतरणे गरजेचे आहे. आणि बहुजन चळवळीशी जुळून घेणे आवश्यक आहे. अन्यथा ओबीसी सुतार समाज बहुजन चळवळी पासुन अडगळीत पडेल.

✒️प्रमोद सूर्यवंशी(चिखली मातृतीर्थ जिल्हा बुलडाणा)मो:-८६०५५६९५२१