थिएटर ऑफ रेलेवन्स’ चे कलाकार नाटक रंगमंचावर नाही तर ‘प्रेक्षकांच्या मेंदूत’ प्रस्तुत करतात !

31

सत्ताधीशांनी रंगकर्माला एवढं उध्वस्त केले आहे की स्वतः रंगकर्मींनाच ते समजत नाही आणि वर्षानुवर्षे सत्ताधीशांच्या जाळ्यात रंगकर्मी फसून राहतात. उदाहरणार्थ, नाटक मनोरंजन किंवा नाटक जनप्रबोधन. लक्ष द्या की, नाटकाची या दोन भागात विभागणी कोणी केली ? मनोरंजन म्हणजे केवळ नफेखोरी म्हणजे भांडवलशाहीचा सापळा आणि फक्त प्रबोधन म्हणजे विशिष्ट पक्षाचा प्रचार,पार्टी विशेष प्रपोगंडा असे स्पष्ट लिहिले आहे.

सत्ताधीश असे का करत असावेत ? नाटकाची समग्रता सत्ताधीश का मोडीत काढतात? जनतेची दिशाभूल सत्ताधीश का करतात? याचे कारण आहे रंगकर्माचे सत्य शोधण्याचे मर्म! रंगकर्माचा विद्रोही स्वभाव! रंगकर्म म्हणजे विद्रोह. रंगकर्म हे केवळ माध्यम नाही, तर ते मानव मुक्तीचे समग्र आणि उन्मुक्त तत्त्वज्ञान आहे. विद्रोहाला दडपण्यासाठी सत्ताधीश ‘रंगकर्म’ बद्दलची अर्धी व अपूर्ण समज पसरवतात आणि अशा नाट्यसंस्था चालवल्या जातात ज्या रंगभूमीच्या सौंदर्यबोधाला चालना देत, रंगकर्माच्या चैतन्याला बोथट करतात. म्हणजे रंगकर्म हे रंगांचे कर्म न राहता, केवळ कौशल्य संपन्न नाचण्या गाण्याचे प्रदर्शन मात्र राहते. रंगकर्माच्या नावाखाली केवळ प्रदर्शन म्हणजे दिखावा प्रेक्षकांना घेरून राहतो. प्रेक्षक प्रदर्शनाला रंगकर्म समजण्याची चूक करतात आणि रंगकर्मींना आयुष्यभर रंगकर्माचे मर्म कळतच नाही!

या चक्रव्यूहाला छेद दिला आहे ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ नाट्य सिद्धांताने! गेली 31 वर्षे प्रेक्षकांच्या निरंतर सहयोग आणि सहकार्याने ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ हे ‘मानवी मुक्तीचे समग्र आणि उन्मुक्त तत्त्वज्ञान’ म्हणून रंगभूमीवर प्रस्थापित करण्यासाठी संपूर्ण जगात आपला अलख जागवित आहे.त्याचे मुख्य आधारस्तंभ आहेत ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’चे कलाकार. ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’चे कलाकार मी लिहिलेल्या अमूर्त संहितेच्या ‘सहज, सौंदर्यबोधाला’ आत्मसात करून, नाट्य संहितेच्या विचाराला ‘कलात्मक’ आत्मियतेने प्रकाशित करतात. प्रेक्षक दोन तास स्तब्ध राहतात,मंत्रमुग्ध राहतात,नाटकाच्या थीमपासून विचलित न होता. विचारांची ज्योत सौंदर्याबोधाला केवळ ‘सजावट’ न राहू देता तिला जीवित करून प्रेक्षकांच्या कल्पना विश्वाला प्रज्वलित करतात. हा प्रकाश कलाकारांच्या कला सिद्धीचे शिखर आहे.

‘थिएटर ऑफ रेलेवन्स’चे कलाकार मला नाटक लिहिण्याची स्वच्छंदता देतात. साधारणपणे कथेच्या रुढीवादी लेखन परंपरेवर नाटके लिहिली जातात. ही व्यवस्था मी माझ्या नाटकांनी मोडून काढली आहे, ती फक्त मोडली नाही तर नष्ट केली आहे. पात्राची कथा न सांगता विचाराला पात्र म्हणून नाटकात प्रस्थापित केले आहे. ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ च्या कलाकारांनी विषयाला साधत आपल्या अभिनयाला ‘कलात्मक चैतन्याने’ प्रकाशित करून अमूर्त नाटकांना मूर्त करून रंगमंचावर नव्हे, तर ‘प्रेक्षकांच्या मेंदूत’ प्रस्तुत केले आहे.‘थिएटर ऑफ रेलेवन्स’च्या कलाकारांना सलाम, प्रेम आणि शुभेच्छा!

✒️मंजुल भारद्वाज(लेखक वैश्विक रंगचिंतक आहेत आणि राजनैतिक विश्लेषक आहेत)