संतुलित पर्यावरणासाठी संतुलित विचार या पर्यावरण सप्ताहाचे आयोजन

51

(जमाते इस्लामी हिंद चा उपक्रम)

✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.6जून):-जमात ए इस्लामी हिंद ही सामाजिक संघटना दरवर्षी मान्सून पूर्वी अभिमान घेवून आरोग्य व पर्यावरणा विषयी सप्ताहाचे आयोजन करून विविध कार्यक्रमाचे आयोजन करते.

या वर्षी राज्यात दिनांक 05 जून ते 12 जून पावेतो
संतुलित पर्यावरणासाठी संतुलित विचार या घोष वाक्याने सप्ताह साजरा करत आहे.

या सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

यात स्वच्छता – आरोग्य आणि पर्यावरणाविषयी जनजागृती , 5O झाडे लावून वर्ष भर त्याचे संगोपन करणे, जाहीर सभा , पथनाट्य , शुक्रवार चे प्रवचन व इतर धार्मिक कार्यक्रमातुन पर्यावरणाविषयी प्रवचने , स्वछता अभिमान , प्लास्टीक चे पर्यावरणवर परिणाम – उपाया विषयी जनजागृती , प्लास्टीक निर्मुलनासाठी नागरिक प्रोत्साहीत करणे , निबध – वक्तृव स्पर्धा , पर्यावरण व वृक्षरोपनासाठी उत्तम कामगीरी करणार्या व्यक्तींचा सत्कार आदि कार्यक्रम घेण्याचा आमचा मानस आहे.

या साठी सर्व स्तरावरून सहकार्य करण्याचे आवाहन अभियान संयोजक मो .नजीब यांनी केले आहे.

तसेच या अभियानासाठी नागरीकांनी ट्रे गार्ड व रोपटे उपलब्ध करून देण्याचे आवाहन सह संयोजक शोएब खान यांनी केले.