समता विद्यालय पाहार्णीचा १०० टक्के निकाल

31

✒️संजय बागडे(नागभीड प्रतिनिधी)

नागभीड(दि.6जून):-माध्य शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ च्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या परीक्षेत नाशिकराव शिक्षण संस्था मोहाली (मो.) व्दारा संचालित समता विद्यालय पाहार्णी या शाळेने दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही उज्वल यशाची परंपरा कायम राखत १००टक्के लागला आहे. यामध्ये कु्. रूचीका वलथरे ही ८९.२०टक्के गुणासह प्रथम तर समीर दिलीप गिरवले हा ८०.४० टक्के गुण मिळवून व्दितीय आला. तर कु. नियती विजय टेकाम ही ७९.०० टक्के गुण मिळवून त्रितीय आली.

शाळेच्या निकालात प्रावीण्य श्रेणीत ०५,प्रथम श्रेणीत १० तर व्दितीय श्रेणीत १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेत शिकणारे सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातील असून कसल्याही प्रकारची खाजगी शिकवणी न लावता विद्यार्थी व शिक्षक यांच्या कठोर परिश्रमाचे फळ होय. यावरून शहरातील विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही कमी नाहीत अशी चर्चा आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे सचिव मा. आनंदभाऊ गेडाम, मुख्याध्यापक, शिक्षक तथा कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व कौतुक केले.