मुलीवरील अत्याचाराचे चित्रीकरण, युवकाला अटक

    39

    ✒️नागपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    नागपूर(दि.23जुलै):-व्हिडीओ गेम खेळण्याच्या बहाण्याने घरी बोलावून १३ वर्षीय मुलीवर अत्याचाराचे चित्रकरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना नवीन कामठी भागात उघडकीस आली. कामठी पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून नराधम युवकाला अटक केली आहे. सिनू विजय जनबंधू (वय १९) हे अटकेतील युवकाचे नाव आहे. सिनूच्या घरी कोणी नव्हते. व्हिडीओ गेम खेळण्याच्या बहाण्याने त्याने मुलीला घरी बोलाविले. तिच्यावर अत्याचार केला. अत्याचाराचे मोबाइलद्वारे चित्रीकरणही केले. अत्याचाराबाबत कोणाला सांगितल्यास मुलीला ठार मारण्याची धमकी दिली. मंगळवारी युवकाने अत्याचाराचे चित्रीकरण परिसरातील मित्रांना दाखविले. याबाबत पीडित मुलीच्या आईला माहिती मिळाली. तिने नवीन कामठी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सिनूला अटक केली.