✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.23जुलै):- खासदार उदय राजे भोसले यांनी राज्यसभा सदस्याची शपथ घेतल्यानंतर जय भवानी जय शिवाजी असा उल्लेख केला त्यावर ‘हे तुमचे घर नाही हे माझे चेम्बर आहे इथे बाकीच्या घोषणा चालणार नाहीत. तुम्ही नवीन आहात पुढच्या वेळी लक्षात ठेवा. असे छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे यांच्या बद्दल स्पष्ट खोटी भावना दाखवणारे भाजप सरकार व भाजप पक्षाचे व्यंकय्या नायडू यांचा निषेध जाहीर निषेध शिवसेना चिमूर तर्फे तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वार समोर भाजप सरकार व व्यंकय्या नायडू यांचा निषेध असो अशा घोषणा व नारेबाजी करीत निषेध करण्यात आला,यावेळी धरमसिह वर्मा माजी उपजिल्हा प्रमुख शिवसेना , केवलसिंग जुनी उप तालुका प्रमुख , मनोज तिजारे उप तालुका प्रमुख , विजय गोठे उप शहर प्रमुख, शुभम गोठे युवा सेना शहर प्रमुख , अभिजित बांडगे , रोशन शेंभेकर ,सचिन भैसारे , प्रफुल गेडाम , शार्दूल पचारे , अर्जुण उरकुडे विशाल बोकडे , राकेश गायकवाड , पांडू समर्थ , रूपेश जुमडे व आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र, मागणी, विदर्भ

©️ALL RIGHT RESERVED