कोवीडसाठी अल्प कालावधीसाठी परिचारिका नेमणे हा शासनाचा कोतेपणा-समविचारी मंच

30

✒️ नितीन रामटेके(गोंडपीपरी, तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634

गोंडपीपरी(दि.23जुलै):-संपूर्ण राज्यात करोनाने हाहाकार माजवलेला आहे.या स्थितीत आरोग्य कर्मचारी कमी पडत आहे.त्यातीलच परिचारीका हा महत्त्वाचा घटक आहे.मुळात सर्व शासकीय रुग्णालयात परिचारीका संख्येने कमी आहेत.
यासाठी महाराष्ट्र समविचारी मंचने सतत मागणी केली पण शासनाने लक्ष दिले नाही.विभागीय आरोग्य संचालकांना, सबंधित मंत्री यांनाही कळवले.जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्या शासनाला कोरोना संकटात परिचारिकांची आठवण झाली.
नवीन निर्णयानुसार तीन महिने कालावधीसाठी परिचारिका नेमणूक करण्याचा मनोदय शासनाने व्यक्त केला आहे.याबाबत राज्यातील अनेक परिचारीका अधिसेवीकांनी समविचारी मंचच्या प्रमुखांशी संपर्क साधला.
यावेळी मृत्यूच्या छायेत वावरायला घेणाऱ्या परिचारिकांना केवळ तीन महिने नेमणूक म्हणजे अन्याय आहे.गरज सरो वैद्य मरो हा शासनाचा डाव कोणत्याही स्थितीत चालणार नाही.अशी भुमिका घेऊन तशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले आहे.
परिचारीका नेमायच्याच असतील तर सरळ थेट सेवा भरती म्हणून घ्या अल्पकालीन नेमून त्यांच्या जीवाशी खेळू नका.असे समविचारी संघटनेचे जिल्हा प्रमुख संदीप वासाडे ,समविचारी प्रमुख बाबा ढोल्ये,महासचिव श्रीनिवास दळवी,प्रदेशाध्यक्ष बापू कुलकर्णी,युवा प्रमुख निलेश आखाडे,परिचारीका राज्य संघटक सौ.प्रियाजी हल्याळकर यांनी म्हटले आहे.