शब्दशृंगार साहित्य मंच आयोजीत राज्यस्तरीय स्पर्धेचा निकाल जाहीर

  44

  बीड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  बीड(दि.23जुलै):- वऱ्हाडी व मराठी भाषेतील सुप्रसिद्ध साहित्य समूह म्हणून ओळख असलेल्या शब्दशृंगार साहित्य मंच समूहात आषाढी एकदशी निमीत्त घेण्यात आलेल्या व कवी प्रदीप हिवरखेडे यांच्या वाढदिवसाचे अवचित साधून घेण्यात आलेल्या ऑनलाईन काव्य स्पर्धेचा निकाल काल जाहीर झाला .निकाल हा ऑनलाईन पद्धतीने समुह प्रमुख विशाल पाटील वेरूळकर यांनी नामवंत कवीच्या उपस्थीत समूहात सुपूर्त केला .
  यामध्ये सर्वोत्कृष्ट लीलाधर दवंडे , उत्कृष्ट संगीता गुळघाने , व प्रथम. अंगद दराडे , द्वतीय .बच्चभाऊ गावंडे , तृतीय सोनाली ढमाळ.आणि उत्तेजनार्थ मध्ये अमेय तलवारे, दिनेश मोहरील, गोपाल मेहंगे , अभय ठाकरे , हे विजेते ठरले आहेत.निकाल येताच अनेकांनी आपले लेखी अभिप्राय समूहात पाठऊन विजेत्याच अभिनंदन केलं.यामध्ये शब्दशृंगार साहित्य मंचे प्रशासक निखिता डाखोरे , नेहा पंडित,योगेश होनाळे, ग्राफिक्सकार विकास पालवे यांनी मोलाचे योगदान दिले व शब्दशृंगार साहित्य मंच विशेष टीम चे कायदेशीर वकील RJ कैलास नाईक सर व पोलिस निरीक्षक गजानन दराडे सर यांनी सहकार्य केले .
  या स्पर्धेसाठी कवी नरेंद्र सा.गुळघाने यांचे परीक्षक म्हणून योगदान लाभले आहे.
  निकाल जाहीर होताच विजेत्याच्या व सहभागी कवी कवयित्री च्या रचनाचा ई काव्यसंग्रह विशाल पाटील वेरूकर यांनी संकलित करून , विकास पालवे यांनी प्रकाशित केला, यामुळे साहित्यिकांना दुहेरी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम शब्दशृंगार साहित्य मंच ने केले आहे .येणाऱ्या काळात शब्दशृंगार साहित्य मंच चे संस्थापक विशाल पाटील वेरूळकर हे त्यांचे दोन प्रतिनिधीक काव्यसंग्रह प्रकाशित करनार आहेत यामध्ये हिंदी भाषेतील एक व मराठी भाषेतील एक या दोन्ही भाषाचा समावेश असनार आहे.तसेच साहित्यिकांना नवनविन संधी प्राप्ती करुन देण्यात येईल , अगामी काळात लवकर हे साहित्य पिठ गुगल पोर्टल तयार करनार आहे.