आष्टी ग्रामपंचायतच्या दुकान गाळे बांधकामातील भ्रष्टाचाराची झाली उच्चस्तरीय चौकशी

36

🔹A high-level inquiry was conducted into the corruption in Ashti Gram Panchayat’s shop construction

🔸उच्चस्तरीय चौकशी समितीने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकान्याकडे सादर केला अहवाल

✒️चामोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

चामोर्शी(दि.28 जून):-गडचिरोली जिल्हयातील चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या आष्टी ग्रामपंचायतचे माध्यमातुन बांधण्यात आलेल्या दुकान गाळे कामात तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याची तक्रार दिनांक १२ मार्च २०२१ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे आष्टी शहर अध्यक्ष राहुल डांगे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे केली होती. त्यानंतर विविध घडामोडी झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उच्च स्तरीय चौकशी समितीची नियुक्ती केली. त्या चौकशी समितीने दिनांक १२ एप्रील २०२३ रोजी आष्टी ग्रामपंचायतला प्रत्यक्ष भेट घेवून चौकशी समितीने आपला अहवाल जिल्हा परिषदकडे सादर केला आहे. या अहवालात कुणावर कार्यवाही करण्याची शिफारस केली आहे. याकडे नागरिकांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

आष्टी ग्रामपंचायतचे तत्कालीन कार्यरत ग्रामविकास अधिकारी यांच्या कार्यकाळात झालेल्या बांधकामाची उच्च स्तरीय चौकशी करण्याकरीता सुरुवातीला तालुका स्तरीय चौकशी समितीने अहवाल बनविला होता. त्यांचा अहवाल मान्य नसल्याने उच्च स्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती.

दिनांक १२ एप्रील २०२३ रोजी चार सदस्यीय जिल्हा परिषद स्तरीय चौकशी समितीने प्रत्यक्ष चौकशी करुन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ३२ पेजेसचा चौकशी अहवाल सादर केला. अहवालात तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांच्या कार्यकाळात झालेल्या अनेक कामातील अनियमितता, रजिस्टर मधील नोंदी, अनामत रक्कम आदी विविध आरोप ठेवण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने वाढीव आकारमानाचे बांधकाम करण्यात आले. तेव्हा सुधारीत अंदाजपत्रक तयार करणे आवश्यक होते. बांधकामाची राज्य गुणवत्ता निरीक्षक श्रेणी २ यांचेकडुन तपासणी करणे आवश्यक होते. परंतु ते करण्यात आले नाही. सिमेंटच्या वापराचा मोजमाप पुस्तिकेत तक्ता तयार न केल्यामुळे प्रत्यक्ष पुरवठा व वापर ताळमेळ करता येत नाही. साहित्याची खरेदी, ई-टेंडर पध्दतीचा वापर करण्यात आला नाही. ग्रामपंचायतने सन २०१८-१९ या वित्तीय वर्षात सेंट्रींग प्लेट पुरविणे किराया, शटर बसविणे, हायमॉस्ट लाईट खरेदी या साहित्यावर १ लाख रुपयापेक्षा जादा खर्च केलेला असतांना खरेदीची प्रक्रिया राबविले नसल्याचे आढळून आले.

कामावर असलेल्या मजुरांचे हजेरीपट ठेवण्यात आले आहे. मात्र हजेरीपटावर मजुरांची स्वाक्षरी घेण्यात आलेली नाही. The attendance record of the laborers at work has been kept. But the signature of the laborers has not been taken on the attendance sheet. अंदाज पत्रक तयार करण्यापूर्वी प्रत्यक्ष मोक्यावर न जाता एकाच आकारमानाचे अंदाजपत्रक तयार केल्याचे दिसुन येते. विविध गाळयाचे आकारमान अंदाजपत्रकापेक्षा भिन्न आहे. बांधकामावर वापरण्यात आलेले सिमेंट बॅग व ग्रामपंचायतने खरेदी केलेले सिमेंट बॅगचा ताळमेळ जुळत नाही. मुळ देयक नसतांना छायांकीत प्रतीच्या आधारे देयकाची रक्कम अदा केल्याचे दिसुन आले. रंगमंच नविन गाळे बांधकाम रोकड बुक (Cash Book) नुसार केलेल्या खर्चापैकी ७ लाख ६५ हजार रुपये नियमबाहयरित्या रोख स्वरुपात खर्ची घातल्याचे दिसून येते. अशाप्रकारे अनेक मुद्यांचा समावेश आहे. कामाची गुणवत्ता न तपासणे या बाबी नियत कर्त्यव्यात कसूर करणाऱ्या असल्याने पंचायत समितीचे शाखा अभियंता हरिदास टेंभुर्णे यांना जबाबदार धरण्यात आले आहे.

ग्रामपंचायतने मुरुम खरेदीमध्ये ७६ हजार ६५८ रुपये जादा खर्ची घातल्याचे आढळून आले आहे. मुल्यांकनापेक्षा जादा खर्च करणारे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी आणि तत्कालीन प्रशासक हे वसुलीकरीता समप्रमाणात जबाबदार ठरतात It has been found that Gram Panchayat has spent Rs.76,658, The then Village Development Officer and the then Administrator who spend in excess of the assessment shall be equally liable for recovery.आदी विविध आरोप करण्यात आले आहे.