शासकीय महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयात पाळणाघराची शासनाने निर्मिती करावी – महिला कर्मचारी

39

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि.28 जून):-शासकीय महिला कर्मचाऱ्यांना आपल्या विषेश मुलाची काळजी घेणं मोठं आव्हान असते जेंव्हा दोघेही पालक नोकरी करत असतील तर बाळाचा सांभाळ करताना पालकांना अनेक समस्या भेडसावतात. या मुलांच्या वाढीमध्ये सातत्याने होणारे बदल आणि उपजत जाणिवांची कमी असणारी क्षमता, अशावेळी मुलांचा सांभाळ करणे पालकांच्या दृष्टीने एक मोठा आव्हान असते. जर दोन्ही पालक कमाविणारे असतील, तर आणखीच त्या मुलांची काळजी घेणं अवघड होऊन बसते. त्यामुळे बऱ्याचदा आई-वडिलांपैकी एकाला मुलाची काळजी घेण्यासाठी घरी रहावे लागते.

सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कार्यालयाची कामाची वेळ असते. कार्यालय दूर असेल तर बाळाला स्तनपानासाठी बाळाच्या आईला ये – जा करण्यास त्रास सहन करावा लागतो. शासकीय महिलांना प्रसूतीसाठी रजा मिळते. मात्र, त्यानंतर कामावर रुजू झाल्यावर नोकरी करून मुलांना सांभाळणे अडचणीचे जाते. शासकीय कार्यालयातील काही महिला कर्मचाऱ्यांनाही चिमुकले सांभाळण्यासाठी अडचण येत असल्यामुळे सातत्याने सुट्टी घ्यावी लागते. त्यामुळे शासकीय कामात वेळोवेळी अडचणी सुद्धा निर्माण होत असतात. कुठे तरी शासकीय महिला कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटावे व बाळांचा सांभाळ योग्य काळजीपूर्वक व्हावा म्हणुन शासकीय
कार्यालयाच्या ठिकाणी पाळणाघराची शासनानी निर्मिती करावी.

——————————

प्रतिक्रिया:-

मी पदाधिकारी आहे , पदाधिकारी लोक असल्या प्रतिक्रिया देत नाही. हे आमचं काम नाही आहे. नगरपरिषदचं
काम आहे.आम्ही बसलो आहोत ही सुद्धा इमारत नगरपरिषदची आहे. तुम्ही सभापतीला विचारा. – ( मनीषा कुरसंगे – महिला व बालविकास अधिकारी जी. प. भंडारा)

——————————————–
हो पाळणाघर असायला पाहिजे कारण लहान बाळाला घरी ठेऊन महिला कर्मचारी कामावर येत असतात, फीडिंग महिलांसाठी तर योग्यच होईल. परंतु त्याचं महिलांकडून पण गैरवापर व्हायला नको. पाळणाघर असेल तर थोड्या वेळासाठी फीडिंग महिलांना आरामसुद्धा मिळू शकेल. जर पाळणाघर झालं तर महिला कर्मचाऱ्यांना योग्यच होईल. – (स्वाती एन. वाघाये – सभापती महिला व बालकल्याण समिती जी. प. भंडारा)