✒️मुज़म्मिल हुसैन(नंदुरबार, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763127223

नंदुरबार(दि.24जुलै):- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत धनगर समाजाचे विद्यार्थी उच्च शिक्षणात मागे पडू नयेत तसेच उच्च शिक्षणाच्या बदलत्या परिस्थतीशी त्यांना जुळवून घेणे शक्य व्हावे यासाठी या समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
यासाठी जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या निवासी शाळांनी शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार विहीत नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक ते कागदपत्र व छायाचित्रांसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन टोकरतलावरोड नंदुरबार येथे सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राकेश महाजन यांनी केले आहे.

महाराष्ट्र, शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED