17 शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड-5 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद येथे सत्कार समारंभ

74

🔹Selection of 17 teachers for the District Teacher Award- felicitation ceremony at Rosy Zilla Parishad on 5th September

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि. 4सप्टेंबर):-सन 2023-24 चा जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता कर्मवीर दादासाहेब मा.सा.कन्नमवार सभागृह, जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहतील.

जिल्ह्यातील एकूण 17 शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली असून यात प्राथमिक विभागाचे 15 तर दिव्यांग/संगीत/ कला विभाग आणि माध्यमिक विभागातील प्रत्येकी एका शिक्षकाची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

पुरस्कारासाठी निवड झालेले शिक्षक : पांडूरंग मेहरकुरे, माधव हाके, भास्कर डांगे, एकता बंडावार, हिरालाल बन्सोड, सुनील हटवार, प्रशांत काटकर, नरेश बोरीकर, वसंत राखुंडे, विठ्ठल गोंडे, बंडू राठोड, प्रशांत बांबोळे, राजेश पवार, अविनाश घोणमोडे, विनोद शास्त्रकार (सर्व प्राथमिक विभाग), संतोष मेश्राम (दिव्यांग / संगीत / कला शिक्षक पुरस्कार) आणि शैलेश बरडे (माध्यमिक विभाग)