कै. श्रद्धेय डॉ. आत्मारामजी गावंडे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे गो.सी.गावंडे महाविद्यालयात आयोजन

    89

    ✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

    उमरखेड (दि. 4 सप्टेंबर):-कै. श्रद्धेय डॉ. आत्मारामजी गावंडे यांचा जन्म दिवस हा आपण कृतज्ञता दिवस (Thanks Giving Day) म्हणून पाळतो, त्यानिमित्त दि. ९ सप्टेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना गो. सी.गावंडे महाविद्यालय, इनरव्हील क्लब व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करण्यासाठी सर्व रक्तदात्यांनी तयार असावे अशी आयोजकांची विनंती आहे. या शिबिरात रक्तदान करण्यासाठी इच्छुक रक्तदात्यांनी नाव नोंदणी सुरु आहे.

    या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा. एक सामाजिक ऋण फेडण्याची ही चांगली संधी आहे. ज्यांनी या महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे किंवा घेत आहेत त्यांनी दि. ९ सप्टेंबर २०२३ रोजी रक्तदान करून महाविद्यालयाने उचललेल्या सामाजिक कार्यात हातभार लावावा.

    दिवसागणिक आपल्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात रक्ताचा तुटवडा भासत आहे. अशावेळी रक्तदान करण्यास पात्र असणाऱ्या प्रत्येकांनी रक्तदान करणे महत्त्वाचे ठरते.

    “रक्तदान हे श्रेष्ठदान आहे”, असे नेहमी म्हटले जाते. कारण एखाद्याला आपण अन्न किंवा अर्थ स्वरूपात दान दिलं तर ते काही मर्यादित काळापर्यंतच त्याच्या उपयोगाचे असते. परंतु एखाद्याला रक्त दिले तर त्याच्या आयुष्यभरासाठी ते रक्ताच्या स्वरूपात उपयोगी पडते.

    आपल्या देशात रोज अपघात होत असतात. ह्या अपघातग्रस्तांना रक्ताची तातडीने आवश्यकता असते तसेच गरोदर मातांना प्रसुती दरम्यान रक्ताची गरज असते.

    अनेक रुग्णांच्या जटिल शस्त्रक्रिया दरम्यानसुद्धा रक्ताची आवश्यकता भासते. ‘सिकलसेल ॲनिमिया’ व ‘थॅलेसिमिया’ या जन्मजात आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना सतत रक्त द्यावे लागते.

    मुख्य म्हणजे रक्त हे कोणत्याही फॅक्टरीत किंवा औषधांनी प्रयोगशाळेत तयार करता येत नाही. रक्त हे शरीरातील असे जीवनद्रव्य आहे की एका व्यक्तीने रक्तदान स्वरूपात दिले तरच ते उपलब्ध होत असते.

    या मानवी जीवनात कोणालाही कधीही रक्ताची आवश्यकता भासू शकते म्हणून माणसाने माणुसकीसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून वषातून किमान दोन वेळा तरी रक्तदान केले पाहिजे.

    रक्तदानामुळे हार्ट अटॅकची जोखीम कमी होते. शरीरात नवीन पेशी तयार होतात. कोलेस्टेरॉलसुद्धा नियंत्रणात राहते. कॅन्सरसारखा आजार होण्याची जोखीम कमी होते.

    मेटाबॉलिझम (चयापचय) सुधारते. ज्यांचे वय १८ वर्षे आहे आणि वजन ४५ किलोच्यावर आहे.

    अशी व्यक्ती रक्तदान करू शकते. रक्तदान करतेवेळी कुठलाही आजार नसावा. निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला बी.पी., शुगरसारखा आजार नसावा. रक्तदान करण्याचा कोणताही धोका नसतो.

    या शिबिरामध्ये परिसर आणि जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ज्या व्यक्ती रक्तदान करण्यास पात्र आहेत.

    त्यांनी येत्या ९ सप्टेंबर २०२३ रोजी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय द्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव बा. कदम करीत आहेत.