राजुरा बाजार येथील बस स्थानकाचे काम पूर्णत्वास जाणार — आमदार देवेंद्र भुयार

147

🔸राजुरा बाजार बस स्थानकासाठी ६०.२२ लक्ष रुपये वितरित करण्याचे निर्देश !

🔹राजुरा बाजार येथील नागरिकांनी मानले आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार !

✒️वरूड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वरूड(दि.21सप्टेंबर):-तालुक्यातील राजुरा बाजार येथ बस स्थानक बांधकामाचे प्रदान करण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतेच्या अनुषंगाने तत्काळ निधी वितरीत करून राजुरा बाजार येथील बस स्थानकाचे काम पूर्ण करण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी शासनाकडे करून यशस्वी पाठपुरावा केल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

मोर्शी विधानसभा मतदार संघातील राजुरा बाजार ता. वरुड येथे बसस्थानक बांधकामास ६०.२२ लक्ष इतक्या रकमेची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती. सदर प्रशासकीय मान्यता नुसार कार्यकारी अभियंता, सार्वजनीक बांधकाम विभाग, अमरावती यांनी निविदा प्रक्रीया राबवुन सदर कामाचा कार्यारंभ आदेश निर्गमीत केल्यामुळे संबंधित कंत्राटदाराने काम चालु केले होते. तथापि, सदर कामाचा निधी जिल्हा नियोजन समिती, अमरावती कडून पुरविण्यात आलेला नाही. संबधित कंत्राटदार आर्थीक अडचणीत असल्यामुळे कार्यकारी अभियंता, सा.बा. विभाग, अमरावती यांचेकडून सदर कंत्राटदारास पहिल्या चालु देयक रु. १०.४४ लक्ष इतक्या रकमेचे (५०५४ रस्ते व पुल या भांडवली खर्च) यामधुन देयक अदा केले आहे.

परंतू अद्याप पर्यंत निधी पुरविण्यात आलेला नसल्यामुळे सदर कामाचे देयकाचे भुगतान झाले नसल्यामुळे काम अर्धवट स्थितीत ठेवुन काम बंद पडले होते. राजुरा बाजार बस स्थानकाचे काम तत्काळ पूर्णत्वास जावे यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी बस स्थानकाच्या कामासाठी तात्काळ ६०.२२ लक्ष रुपये इतका निधी वितरीत करण्याची मागणी शासनाकडे केली होती.

आमदार देवेंद्र भुयार यांनी जिल्हा वार्षिक योजना, नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत राजुरा बाजार बस स्टैंड बांधकामासाठीचा निधी सन २०२३ २४ च्या मंजूर अनुदानातून वितरित करण्यास मंजूरी देण्याची मागणी केल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१६-१७ नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत राजुरा बाजार बस स्टँड बांधकामासाठी रुपये ६०.२२ लक्ष ची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. परंतु कामकाजाची अपेक्षित प्रगती झालेली नसल्याने नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत कोणताही निधी सन २०२२-२३ अखेरपर्यंत वितरीत करण्यात आलेला नव्हती. सद्यस्थितीत प्रशासकीय मंजूरी मिळालेल्या कामांपैकी काही कामे पूर्ण झालेली आहेत.

त्यामुळे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०१६-१७ नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांचे शासनावर दायित्व रहात आहे. त्यानुसार उपरोक्त कामासाठी आवश्यक असलेला रुपये ६०.२२ लक्ष इतका निधी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून उपलब्ध करुन देण्यात यावा असे निर्देश सहसचिव नियोजन विभाग यांना मा. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांनी निर्देश देऊन मान्यता प्रदान करण्याबाबत निर्देश दिल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे सहसचिव यांनी जिल्हाधिकारी यांना शासन पत्र काढून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिल्यामुळे लवकरच राजुरा बाजार येथील बस स्थानकाचे काम पूर्णत्वास जाणार असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली असल्यामुळे राजुरा बाजार येथील नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.