आनंद ही आनंद,आनंदी शिधा व स्वस्त धान्यचा लाभ भेटत नसल्याने गावकऱ्यांनी तहसील कार्यालयात घेतली धाव

244

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.21सप्टेंबर):- तालुक्यातील रुमान या गावातील गावाकऱ्यांना महाराष्ट्र व केंद्रशासनच्या वतीने स्वस्त धान्य अंतर्गत गणेश उत्सवाच्या काळात आनंदी शिधा ग्राहकांना मिळावा यासाठी आदेशित असताना गंगाखेड तालुक्यातील रूमना गावामध्ये सात सप्टेंबर रोजी तहसील मधून धान्य पुरवठा उचलूनही आनंदी शिधा व स्वस्त धान्य देण्यात येत नाही मग “शासन आपल्या दारी “कसे होऊ शकते. रूमला गावातील ग्राहकांनी गंगाखेड तहसील मध्ये जास्तीच्या संख्येने येऊन आपली तक्रार मांडण्यासाठी तहसीलदार यांच्या केबिन कडे गेले असता “मीटिंग चालू आहे असे म्हणत” सर्व ग्राहकांना तहसील कार्यालया बाहेर काढण्यात आले.

काही वेळानंतर मीटिंग संपल्यास तहसीलदारनी नागरिकांना मध्ये बोलवत त्यांची निवेदन स्वीकारत तहसीलदार म्हणाले “आपल्या निवेदनावर उद्या तहसील मार्फत पंचनामा पथक येईल.तक्रारी मध्ये काय तथ्य आहे हे उद्या समजून जाईल” गणेश उत्सव लक्ष्मीपूजन सुरू होऊनही आजपर्यंत आनंदी शिधा मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी काय करावे? गावचे सरपंच यांची उपस्थिती होती. सुरुवातीला तर रूमना गावातील नागरिक स्वस्त धान्य दुकानदार राजेभाऊ सोळंके यांची तक्रार घेऊन आले असता”मीटिंग चालू आहे “या कारणावरून सर्व ग्राहक नागरिकांना तहसील बाहेर काढण्यात आले बिचारे सर्व ग्राहक बैठा सत्याग्रह करण्याच्या तयारीत असताना नायब तहसीलदार यांच्या सांगण्यावरून सर्व ग्राहकांना तहसील बाहेर जावे लागले.

तहसील कार्यालय बैठकीमध्ये एक प्रमुख उपस्थितीमध्ये उपविभागीय अधिकारी असल्यामुळे या आशेने सर्व ग्राहक तहसील परिसरामध्येच बसून राहिले काही वेळात बैठक संपताच उपविभागीय अधिकारी बाहेर येताच सर्व निवेदनकर्त्यांनी एस.डी.ओ.साहेबांच्या गाडीला गरडा घातला परंतु उपविभागीय अधिकारी यांनी “निवेदन द्या बघूयात?असे म्हणत “स्वतःची सुटका करत निघून गेले.स्वस्त धान्य दुकानदार राजेभाऊ सोळंके यांच्या नावात “भाऊ “शब्द असतानाही ग्रामीण भागातील महिला भगिनीं ग्राहकांना तक्रारीसाठी तहसील कार्यालयात यावे लागते.