सुनांना लक्ष्मी मानून केली महालक्ष्मीची स्थापना

376

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.26सप्टेंबर):-पासुन चार की.मी.अंतरावर असलेले गाजीपुर या गावांमध्ये रमेश महादेव मस्के यांच्या घरी साक्षात मूर्ति नाही तर दोन सूना यांना महालक्ष्मीच्या दर्जा देऊन महालक्ष्मी रूपाने त्यांना सन्मानाने उभे करून त्यांची पूजा अर्चना करून स्थापना करण्यात आली. महालक्ष्मी पाहण्यासाठी पंचक्रोशीतील महिला पुरुषांनी दर्शनासाठी व या उपक्रमासाठी शेकडोंच्या संख्येने गर्दी केली होती.

रमेश मस्के व रेखाताई मस्के यांच्या भास्कर आणि राहुल नामक मुलांच्या पत्नी निलिमा आणि मयुरी यांना महालक्ष्मी सारखे स्थापना करून सुनाचा आदर सन्मान करणाऱ्या या मस्के परिवाराचे दारवा पंचक्रोशी मध्ये अभिनंदन केल्या जात आहे. मस्के परिवाराचा असा आदर्श सर्वांनी जोपासावा अशाच -हास्त अपेक्षा या निमित्ताने सर्वांकडून व्यक्त केल्या जात आहे.