निलेश पाटील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित !….

137

🔸पुरस्काराने ऊर्जा मिळते – निलेश धर्मराज पाटील

✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

जळगाव(दि.1ऑक्टोबर): – जि.प.शाळा थोरगव्हाण येथील उपक्रमशील शिक्षक निलेश धर्मराज पाटील यांना धुळे येथे नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम यांच्या माध्यमातून ५ सप्टेंबर, २०२३ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती शिक्षक दिनाचे औचित्य साधून त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन अजय भवन, धुळे येथे मान्यवरांच्या हस्ते “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार ” देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन भारतीय सेनेचे निवृत्त कर्नल गणपती श्रीनिवासन, धुळे ग्रामीणचे लोकप्रिय आमदार बाबासो कुणाल पाटील, जि प उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब शिवाजी अकलाडे, नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम राष्ट्रीय अध्यक्ष गोरख देवरे, महाराष्ट्र राज्याचे नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम अतिरिक्त डायरेक्टर प्रमोद पाटील उपस्थित होते.

या अगोदर निलेश धर्मराज पाटील यांना राज्यस्तरीय – ३, जिल्हास्तरीय -१, केंद्रस्तरीय -१ व गावस्तरीय -१ असे विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुरस्काराने ऊर्जा मिळते असे प्रतिपादन पाटील यांनी केले. पाटील यांचे सर्वत्र मित्र परिवाराकडून व शिक्षक बांधवांकडून अभिनंदन होत आहे.