ब्रह्मपुरी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

    40

    ✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी, तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

    ब्रह्मपुरी(दि.27जुलै):-मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त नीतिनजी मत्ते (चंद्रपुर जिल्हा प्रमुख) व संजयजी काळे (विधानसभा संपर्क प्रमुख) यांच्या मार्गदर्शनात, कोविड-19 या संसर्गजन्य महारोगामुळे रक्ताचा होत असलेला तूटवडा बघता, रक्ताची कमतरता दूर करन्याकरिता ब्रम्हपुरी शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने ख्रिस्तानंद रुग्णालय ब्रम्हपुरी येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

           रक्तदान शिबीरात 40 शिवसैनिकांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी म्हणून ब्रम्हपुरी शहराच्या नगराअध्यक्ष सौ. रिताताई उराडे यांच्या हस्ते रिबीन कापून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. तसेच ब्रम्हपुरी शिवसेना शहर प्रमुख नरुभाऊ नरड, तालुका संघटक रिंकुंभाऊ पठाण, माजी तालुका प्रमुख नरेंद्रभाऊ गाडगीलवार, मिलिंदभाऊ भणारे, प्रा. श्याम करंबे सर, परागभाऊ माटे( उप तालुका प्रमुख),आकाश शेंद्रे(युवा सेना तालुका प्रमुख), अमोल माकोडे,आशिष गाडंलेवार, पंकज भोयर, महेश माकडे, लोकेश अंबादे, स्वप्नील भागडकर,पवन सोनवाणे जयाताई कन्नके (तालुका संघटिका), निर्मालाताई राऊत( शहर संघटिका), सुरेखाताई पारधी व सर्व शिवसेना पदाधीकारी व शिवसैनिक उपस्थित होते.