गावाच्या सार्वांगीण विकासासाठी ग्रामसभेत ग्रामस्थांचा सहभाग प्रथम सामाजिक कर्तव्य – ग्राम अधीकारी हेमंत रामटेके

267

🔹चोरटी ग्रामसभेव्दारे सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती गठीत

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.6ऑक्टोबर):-प्रत्येक गावातील ग्रामसभा ही गावांचे हक्काचे व्यासपीठ असते. ती गावातील लोकसभा असते. गावातील लोकांनी एकत्र यावे, लोकांच्या गरजा सांगाव्यात , गावांच्या भल्यासाठी गावातील ग्रामस्थांचा सहभाग असेलेले गावातील लोकांचे व्यासपीठ म्हणजेच ग्रामसभा. पंचायतराज मध्ये ग्रामसभेला अनन्य साधारण महत्व आहे. ग्रामसभा ही खर्या अर्थाने लोकशाही संस्था आहे. ग्रामस्थांच्या सहभागातून कारभार अधिक पारदर्शक व्हावा, तळागाळातील लोकांचा आवाज शासनापर्यंत पोहचावा म्हणून, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 7 अ अन्वये प्रत्येक गावासाठी एक ग्रामसभा अस्तित्वात आली.

ग्रामसभेबाबत असलेली उदासीनता झटकून, लोकांनी ग्रामपंचायतीच्या कारभारात आवर्जून सहभाग घेतला तर नक्कीच देशातील गावे-खेडी खर्या अर्थाने समृद्ध होतील. ग्रामसभेत गावाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे फक्त वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या मर्यादेपुरते ग्रामसभेत उपस्थित न राहता प्रत्येक ग्रामसभेत आवर्जून उपस्थित रहावे हे गावातील लोकांचे प्रथम सामाजिक कर्तव्य आहे.

दिनांक चार आक्टोबर 2023 ला चोरटी ग्रामसभेपुढे ग्रामविकासाचे विविध विषय ठेवण्यात आले. वन अधिकार अधिनियम 2006 व षासन निर्णय 24 जून 2015 नुसार सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती समिती गठित करणे हा विषय ठेवल्या गेला व या विषयानुसार 11 सदस्यिय समिती गठीत करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष श्री उद्धव कोरवाते, सचिव श्री विनोद राऊत तर कोषाध्यक्ष म्हणून सौ आशाताई चदनखेडे याची नियुक्ती करण्यात आली.

ग्रामसभा यषस्वीतेसाठी चोरटीचे सरपंच सौ निषा मडावी व मेंबर श्री राजू राउत पाटिल, श्री दिलीप राउत पाटिल , श्री लोकेष राउत, श्री बळिराम बुल्ले , श्री प्रितम ढोरे व सर्व गावकरयांनी विषेष परीश्रम घेतले.