डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय येथे टेक्नोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

121

✒️सांगोला(पुरोगामी न्युज नेटवर्क)

सांगोला(दि.6 ऑक्टोबर):-रोजी “सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला” या संस्थेचे संचालक व युवा नेते डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय येथे टेक्नोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे पहिले सत्र हे स्वागत समारंभाचे सत्र होते. त्यामध्ये कार्यक्रमाची सुरुवात सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते कै.आ.डॉ. भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगणकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. हणमंत कोळवले यांनी केले.

प्रास्ताविकानंतर संस्थेचे संचालक प्रा. दिपक खटकाळे सर यांनी आपल्या मनोगतात टेक्निकल ज्ञानावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा असे सांगितले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी संगणकाचे परिपूर्ण ज्ञान घ्यावे असे सांगितले. प्राचार्य यांच्या मनोगतातनंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व एसडेमन प्रा.लि. पुणे या कंपनीचे प्रमुख संचालक मा. श्री. इमाम नदाफ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी असे सांगितले की एका लँग्वेजचे नॉलेज न घेता अनेक लँग्वेजचे ज्ञान घेऊन विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ‘वेब डिझाइनींग’ आणि ‘टेक्निकल क्वीज’ असे दोन राऊंड पार पडले. वेब डिझाईन मध्ये प्रथम क्रमांक हा सांगोला महाविद्यालय सांगोलाचा विद्यार्थी कु. सुरज नरळे यांनी पटकावला, तर व्दितीय क्रमांक डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोलाचा विद्यार्थी कु. उमेश पांढरे यांनी पटकावला. तृतीय क्रमांक हा डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोलाचे विद्यार्थी कु. अतिश होवाळ व कु. विठ्ठल शिंदे यांनी मिळवला आहे. टेक्निकल क्वीजमध्ये प्रथम क्रमांक हा सांगोला महाविद्यालय सांगोलाची विद्यार्थीनी कु. संध्याराणी इंगोले हिने पटकावला, तर व्दितीय क्रमांक सांगोला महाविद्यालय सांगोलाची विद्यार्थीनी कु. तांबोळी अल्फीया हिने पटकावला. तृतीय क्रमांक हा डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोल्याच्या विद्यार्थीनी कु. प्रतिक्षा आमले , कु. येडगे कोमल व कु. पाटील निकिता यांनी मिळवला आहे. सदर स्पर्धांचे परीक्षक म्हणून सक्सेस अकॅडमीचे संचालक श्री. संतोष वाघमोडे व श्री. इमाम नदाफ यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाच्या तिसरे सत्र हे निरोप समारंभाचे सत्र म्हणून संपन्न झाले. त्यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिस व ट्राफी वाटप करण्यात आले. तसेच प्रातिनिधिक स्वरूपांत काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर सक्सेस अकॅडमीचे संचालक श्री. संतोष वाघमोडे व श्री. इमाम नदाफ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सदर स्पर्धेमध्ये सांगोला महाविद्यालय सांगोला, आय.सी.एम.एस. कॉलेज पंढरपूर, संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर, फॅबटेक कॉलेज सांगोला, शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज सांगोला व इतर अनेक प्रतिष्ठित महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली होती.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला मधील बी.एस्सी (ई.सी.एस.) भाग-२ व ३ आणि बी.सी.ए. भाग-२ व ३ मधील विद्यार्थी, विद्यार्थीनी व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. संजीवनी गव्हाणे व प्रा.निसार शेख यांनी केले.