भाजपा ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष डॉ, प्रा.अशोक सालोटकर यांचे हस्ते आयुष्यमान भारत कार्डचे वितरण

118

🔹पवन जयस्वाल यांनी समजावून सांगितले आयुष्यमान भारत कार्डचे महत्व

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.6ऑक्टोबर):-पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस संपन्न झाला. या दिवसाचे औचित्य साधून जनसेवाभिमुख भारतीय जनता पक्षाने दिनांक 18 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवडा साजरा करण्याची घोषणा केली. त्यानुसार नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त प्रायोजित सेवा पंधरवड्याची भाजपा कार्यालय ब्रह्मपुरी तर्फे दोन ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला.

या सेवा पंधरवडा अंतर्गत 24 सप्टेंबर 2023 रोजी आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी कार्यक्रम (पाच लाखापर्यंत मोफत उपचार योजना) सकाळी 10 ते दु. 2 वाजेपर्यंत भाजपा कार्यालयात राबविण्यात आला.यावे यावेळी तालुक्यातील बहस़ंख्य जनतेनी आयुष्य भारत कार्ड नोंदणी करून घेतली..
अश्या नोंदणी कृत लाभार्थ्यांची आयुष्यमान भारत कार्ड क्रमाक्रमाने वितरीत जात आहे.

दिनांक 6 आक्टोबर रोजी ब्रह्मपुरी येथील जयस्वाल काम्प्युटर इंस्टुटमध्ये तयार झालेले आयुष्यमान भारत कार्डचे भाजपा ओबीसी मोर्चा ब्रह्मपुरी शहराध्यक्ष प्रा.डॉ. अशोक सालोटकर यांचे हस्ते बोढेगांवच्या श्रीमती सगन लालचंद मेश्राम यांना वितरण करण्यात आले. आयुष्य मान भारत कार्डचे महत्व इन्स्टिट्यूटचे मालक तथा संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती ब्रम्हपूरीचे विद्यमान सदस्य पवन जयस्वाल यांनी समजावून सांगितले. अक्षय लांजेवार संयोजक भाजपा सोशल मीडिया सेल, चिमुर विधानसभा क्षेत्र यांची उपस्थिती होती.