लॉकडाऊन च्या काळातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर मराठवाड्यातील सामाजिक संस्था यांनी प्रशासनाच्या समोर मांडल्या मागण्या…!!

✒️राम शेळके(बीड प्रतिनिधी)

बीड(दि.28जुुलैै):-डमागच्या साधारपणे 20 मार्च 2020 च्या नंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. त्यावेळी तात्काळ आवश्यक असणारी गरज ओळखून कोरो इंडिया आणि त्यांच्या सोबत काम करणाऱ्या महाराष्ट्र मधील 42 संस्था सोबत वंचित गटातील लोकांच्या याद्या करून “फूड किट ” तयार करून वाटप करण्यात आले. त्याच्या नंतर लोकांच्या पुढाकाराने प्रोसेस उभी करून स्थानिक पातळीवर लोकांना मदत मिळवून देणे, स्थानिक पातळीवर वंचित घटकातील अत्यंत गरजवंत लोकांच्या याद्या करून ” स्थानिक स्वराज्य संस्था ” च्या पुढाकाराने तहसीलदार, गट विकास अधिकारी यांच्या पर्यंत ही माहिती देण्यात आली.
आज सदरील बाबीची माहिती जिल्हाधिकारी यांना व्हावी. आणि एकूण संपूर्ण राज्यातील डेटा विश्लेषण केल्यावर समोर आलेल्या मागण्या घेऊन एकाचं दिवशी संपूर्ण राज्यातील 22 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या कडे मागण्याचे निवेदन आणि अहवाल देण्यात आले. या सर्व बाबीसंदर्भात आज बीड जिल्हधिकारी राहुल रेखावार यांच्या सोबत एकल महिला संघटना, कोरो इंडिया, समता प्रतिष्ठान, क्रांतीशीह नाना पाटील शेतकरी विकास प्रतिष्ठान, अंकुर सामाजिक संस्था यांच्या प्रतिनिधी यांचे शिष्टमंडळाने निवेदन आणि अहवाल सादर केला.
या शिष्टमंडळात लक्ष्मण हजारे,रुक्मिणी नागापुरे,आशा शिंदे, कैशल्या बावणे, बळीराम भोसले यांची उपस्थिती होती….!!

बीड, महाराष्ट्र, मागणी, राजनीति, राज्य, रोजगार, शैक्षणिक, सामाजिक 

One thought on “लॉकडाऊन च्या काळातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर मराठवाड्यातील सामाजिक संस्था यांनी प्रशासनाच्या समोर मांडल्या मागण्या…!!

  1. मा. संपादक साहेब,
    पुरोगामी संदेश
    कृपया मला पुरोगामी संदेश चा बीड प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी ही नम्र विनंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED