वंचित बहुजन आघाडीने केली EVM मशीनची होळी-चिमुरात निघाला हजारो कार्यकर्ताचा जनआक्रोश मोर्चा

    244

    ✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

    चिमूर(दि.19ऑक्टोबर):- महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त, अल्पसंख्याक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, बेरोजगार व शासकीय निमशासकीय तसेच खाजगी आस्थापनेतील सर्व कर्मचारी सेवकांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी ‘EVM हटाव, संविधान बचाव’ या मागणीकरिता भव्य मोर्चा चिमूर उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर घाडगे यांना निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान मोर्चा संविधान चौकापासून अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचताच ‘EVM मशिनच्या प्रतिकृतीची होळी करण्यात आली.

    महामहीम राज्यपाल रमेश बैस यांचे नावाने असलेल्या निवेदनात भारतीय निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरवर घेण्यात यावी, तीन पिढ्यांची अट रद्द करून जबरानजोत धारक शेतकऱ्यांचे तात्काळ पट्टे वाटप करावे, के.जी. ते पि.जी. शिक्षण मोफत करण्यात यावे, ६२ हजार शासकीय शाळांचे खाजगीकरण रद्द करावे, सर्व जातीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, दिनांक ६ सप्टेंबर २०२३ रोजी कंत्राटीकरणाच्या शासन निर्णय रद्द करण्यात यावा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे खाजगीकरण बंद करावे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर कराव्या, शासकीय निम शासकीय व खाजगी आस्थापनेतील नियमित कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा.

    गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यां बारमाही सुरू करावे, दुष्काळग्रस्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी व देण्यात यावी, गोंडवाना विद्यापीठात झालेली बोगस प्राध्यापक भरती रद्द करावी, चिमूर तालुक्यातील अपात्र झालेल्या घरकुलांच्या याद्या तात्काळ जाहीर कराव्या, शेतकऱ्यांच्या कापसाला रु. १५०००/- हमीभाव द्यावा, चिमूर तालुक्यातील शेतातील पांदणरस्ते तात्काळ मंजूर करावेत, शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कर्ज सरसकट माफ करावे, धान उत्पादन शेतकऱ्यांना रु. ५०००/- प्रति किंटल देण्यात यावे, शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा देण्यात यावा, संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे थकित हमे त्वरीत देण्यात यावे आदि मागण्यांचा समावेश होता. या मोर्च्याचे नेतृत्व वंचित बहुजन युवा आघाडीचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष शुभम मंडपे, तालुका अध्यक्ष डॉ. बाळासाहेब बन्सोड यांनी केले.

    या वेळेस मार्गदर्शक म्हणून भदंत ज्ञानज्योती महाथेरो, भदंत धम्मचेती (संघारामगिरी, ताडोबा अभयारण्य), कुशल मेश्राम (महा. प्रदेश सदस्य), डॉ. रमेशकुमार गजभे (माजी राज्यमंत्री, विदर्भ प्रमुख समन्वक), अरविंद सांदेकर (विदर्भ समन्वयक), राजेश बोरकर (जिल्हा प्रभारी), राजू मेश्राम (उमरेड), नीलकंठ शेडे (जिल्हा सल्लागार),प्रकाश मेश्राम आदि मान्यवर उपस्थित होते.

    मोर्चा यशस्वी करण्याकरिता अॅड. नितीन रामटेके, सिद्धार्थ चहादे, मनोज सरदार, राजू घोनमोडे, मनोज राऊत, भाग्यवान नंदेश्वर, आकाश भगत, वासुदेव गायकवाड, उध्दव मोहड, प्रविणा डांगे, डॉ. शैलेश गायकवाड, रामदास राऊत, कैलास वाघमारे, अमोल गजभिये, किशोर घोनमोडे, संदीप शंभरकर, जनार्दन खोब्रागडे, प्रकाश मेश्राम, अमित गेडाम, सुभाष ठवरे, विनोद येसांबरे, अरुण मेश्राम, झामानंद धनविजय, मधुकर नागपूरे, मारोती शिवरकर, रोशन मंडपे, विशाल दिवे, रवीद्र शेंडे, धर्मपाल डांगे, किशोर घोनमोडे, संदीप ढोक, गौतम धनविजय, अरुण सवाईमुन, कैलास वाघमारे, तस्वीर बोरकर, जया बोरकर, पंकज गायकवाड, नरेश मोटघरे, गोपी गुटके, मिलिंद पाटील, रतन बोरकर, अजय गजभिये, किशोर जांभुळकर, नाना मेश्राम, प्रल्हाद बोरकर, विकास घोनमोडे, अजित मेश्राम, अरविंद सांगोळे, सुमेद सुखदेवे, संघशील रामटेके, तथागत रामटेके, संगम सुखदेवे, रतिराम पाटील, सुरज सुखदेवे, बन्सोड किरण ढोक, प्रदीप मेश्राम, कृष्णा डांगे, निखिल मुन, संदीप धनविजय, निखिल रामटेके, अस्मित रामटेके, सुचित सुखदेवे, आशिष बोरकर, आशिद मेश्राम, प्रदिप मेश्राम, विशाल गेडाम, सुमेध वाघमारे, दुर्योधन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो कार्यकत्यांनी परिश्रम घेतले.