श्रम साफल्य योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करा. नगर परिषदेच्या सफाई कामगार यांचे उपविभागीय कार्यालया गंगाखेड,समोर बेमुदत धरणेआंदोलन

70

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.19ऑक्टोबर):-नगरपरिषदेची तत्कालीन मा. नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी सत्तेवर असताना आश्वासन दिले होते लवकरच नगर परिषद सफाई कामगारांना वसाहतीसाठी जागा देऊन श्रम साफल्य योजनेची अंमलबजावणी करू. परंतु आजपर्यंत श्रम साफल्य न मिळाल्यामुळे मराठवाडा नगरपरिषद व कामगार कर्मचारी युनियन लाल बावटा संघटनेच्या वतीने ते मुद्दत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.

उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर गंगाखेड येथे सफाई कामगार प्रश्नावर प्रलंबित इतर मागण्यासह श्रम साफल्य योजनेची अंमलबजावणी करा, सफाई कामगारांना दर महिन्याला पाच तारखेला वेतन देण्यात यावे, सफाई कामगाराची सर्विस बुक चे अपडेट लवकर करण्यात यावे, सफाई कामगारांना 12 व 24 वर्षाची पदोन्नती द्या,कंट्राक्टी कामगारांना किमान वेतन मिळते का नाही याची शहानिशा करा, कंट्रकदाराकडून किमान वेतनाचा फरक वसूल करून तो कंत्राट कामगारांना अदा करा,आधी मागण्यासह 18 ऑक्टोबर 2023 पासून बेमुद्दत धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आले आहे.

निवेदनावर कॉम्रेड ओंकार पवार, परसराम साळवे,विजय लांडगे, राजकुमार गायकवाड,श्रीमंत मुंडे,अमोल डाके,शंकर मुंडे,शेख शफिक,देशराज वावळे,रमेश मुंडे, पांडुरंग साळवे,भास्कर बचाटे,जनार्दन जंगले,बालाजी जोगदंड,भुजंग साळवे,रानबा मोते,उषाबाई खंदारे,कमलबाई शेळके,रुक्‍मीनबाई साळवे,शांताबाई साळवे, लक्ष्मीबाई साळवे,रुक्‍मीनबाई जोगदंड,मालनबाई अवचार, धीरूभाई कांबळे,मिनाबाई सावंत, मुक्ताबाई सावंत, शोभाबाई साळवे,चंद्रकलाबाई भालेराव,कौसाबाई गवाले, रंगूबाई साळवे,छबुबाई भालेराव,राजमलाबाई गेचंद्र, गयाबाई साळवे,सलुबाई साळवे, फुलबाई साळवे,शिलाबाई सावंत, वंदना साळवे,इत्यादींच्या सह्या आहेत.